मुख्य बातम्या

माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुदल्या होत होत्या, पण लक्षात ठेवा…

कोल्हापूर- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची सगळे कडे पसरली बातमी होती. त्यावरुन खुद्द धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला आहे.

मागच्या तीन चार तासापासून चर्चा सुरू आहे की धनंजय मुंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले आहे. ही बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या. पण लक्षात ठेवा आम्ही ऐवढे निब्बर आहोत की भाजपा- शिवसेना सरकारला घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असं विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ परिवर्तन सभेनिमित्त जात असताना धनंजय मुंंडे यांचं हेलिकॉप्टर भरकटले अशी बातमी सर्वत्र पसरली होती. या बातमी नंतर मुंडे यांनी विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे.

Most Popular

To Top