महाराष्ट्र

शरद पवारांच्या विचारांची आणि कार्याची ओळख नव्या पिढीसाठी एक ऊर्जा स्त्रोत : प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चा विद्यार्थी संवाद सायकल दौरा

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन करत नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. सायकलवर फिरून शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन प्रत्यक्ष भेट घेत त्यांना पक्षाशी जोडून घेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आकुर्डी येथील डी वाय पाटील महाविद्यालयाच्या आवारात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या या “विद्यार्थी संवाद – सायकल दौरा” चे उद्घाटन झाले.

या उपक्रमाची माहिती देताना विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर यांनी सांगितले की शहरातील प्रत्येक महाविद्यालयात जाऊन आम्ही या सायकल यात्रेच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे, संघटनेची कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी याबाबतीत विद्यार्थ्यांशी संवाद साधत अधिकाधिक विद्यार्थी मित्र मैत्रिणींना राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेत जोडून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर पवार साहेबांनी केलेले काम तसेच शिव-शाहु-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की आदरणीय शरद पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड शहर, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात बहुमोल कार्य केले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी, औद्योगिक विकास, क्रिडा अशा अनेक क्षेत्रात पवार साहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेत या क्षेत्रांचा चेहरा मोहरा बदलला. मात्र नव्या पिढीला याबाबत फारशी माहिती नाही. शरद पवार साहेबांचा राजकीय प्रवास, कार्य आणि त्यांचे राजकीय-सामाजिक निर्णय याचा अभ्यास म्हणजे नव्या पिढीसाठी एक ऊर्जा स्त्रोत आहे. नव्या पिढीने पवार साहेबांना जाणून घेतले तर त्यांच्या पुढील आयुष्यात ते कधीही संकटांना घाबरून खचून जाणार नाहीत.*

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, शहरात पवार साहेबांच्या विचारांवर निष्ठा असणाऱ्या लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरात पुन्हा ताकदीने उभा करण्याचा आपला जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नात विद्यार्थी संघटनेने उचललेला वाटा महत्त्वाचा आहे. विद्यमान राजकीय परिस्थितीकडे पाहून नवीन पिढी राजकारणापासून दूर जात असताना सायकल यात्रेसारख्या या उपक्रमामुळे शहरातील नवीन पिढी पवार साहेबांच्या कार्याची आणि विचारांची ओळख झाल्यामुळे पक्षासोबत जोडली जाईल.

यावेळी महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, संदीप चव्हाण, विद्यार्थी प्रदेश मुख्य सरचिटणीस विनोद भांगे, प्रदेश सरचिटणीस तन्मय देशमुख,सहकारी मुख्य प्रवक्ते राहुल नेवाळे,हर्षल परमार,सुरज देशमाने,ऋषभ भडाळे,ज्ञानेश्वर पुदाले राहुल राऊत,संकेत वाघमारे कृष्णा राऊत श्रीकांत शिंदे,गणेश सूर्यवंशी रामेश्वर कस्तुरे श्रीनाथ राउत गोविंद कस्तुरे शरद राऊत व इतर विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.

Most Popular

To Top