वर्धा : महात्मा गांधी जयंतीनिमित्त वर्धा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पवनार व सेवाग्राम आश्रमात भेट देउन अभिवादन केले. त्यावेळी त्या म्हणाल्या की वर्धा हा पवित्र जिल्हा आहे. या स्थळी महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा पदस्पर्श झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील. वर्षातून एकदा सेवाग्राम आश्रमाला भेट देत असते. त्यामुळे नवी ऊर्जा मिळते. राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यास सोयाबिनला सात हजार तर बारा हजार रुपये प्रती क्विंटल भाव देवू. या लोकशाही विरोधी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. इतरांचे घर फोडण्याची यांची धडपड चालू आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या सोबत माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख, रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, सुधीर कोठारी, समीर देशमुख, अतुल वांदिले प्रामुख्याने उपस्थित होते.
संधी दिल्यास येथून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा राहील…
By
Posted on