महाराष्ट्र

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? याबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

पुणे- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात येणार का? याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता जवळ येत आसल्यामुळे या चर्चेने वेग पकडला आहे. पण याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनीच उत्तर दिलयं.

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारला असता. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या मला पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात फारसं स्वारस्य नाही, मी लोकसभेसाठीच पुन्हा एकदा इच्छुक आहे. असं म्हणून त्यांनी या प्रश्नाला पूर्णंविराम दिलाय.

दरम्यान, आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.

Most Popular

To Top