महासत्ता- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लवकरच लोकसभा निवडणुकीचे कॅम्पेनिंग सुरू होईल. त्याला वेळ घालवून चालणार नसल्याचे स्पष्ट मत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
जागा वाटपाचा विषय फार राहिलेला नाही. विधानसभेचा विषय लोकसभेनंतर घेतला जाईल, आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह इतर मित्रपक्षाद्वारे लढवली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि मी चर्चा केली आहे. ज्या ठिकाणी जे प्रभावी आहेत, निवडणून येणाची क्षमता आहे तेथे त्यांना जागा देण्याचा निर्णय झाला आहे. असंही शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूरसह सातारा आणि हातकणंगलेची जागाही राष्ट्रवादीकडे असेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
