महाराष्ट्र

नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील :- धनंजय मुंडे

महासत्ता :-  दि.14 – संत भगवानबाबांची मूर्ती जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय निषेधार्ह आणि भावना दुखावणारी आहे. हे कृत्य करणा-या त्या माथेफिरूला तात्काळ जेरबंद करा , अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांची मुर्ती जाळण्याचा प्रयत्न होतो. त्या माथेफिरूची ओळख पटलेली असते, तरी त्याला बेड्या का ठोकल्या जात नाहीत. पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सवाल करून या माथेफिरुवर कारवाई करण्याची जबाबदारी शासनाची, गृह विभागाची आणि पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे, त्याला तात्काळ जेरबंद करावे. नाहीतर याचे परिणाम फार वाईट होतील असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची, गृह विभागाची आहे. माझ्याप्रमाणेच संत भगवान बाबांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व जाती-धर्मातील लोकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असेही ते म्हणाले.

Most Popular

To Top