मुख्य बातम्या

५६ इंच छाती असणारा चौकीदार पळून गेला – राहूल गांधी

महासत्ता-  लोकसभेत राफेल प्रकरणावरील चर्चेवेळी ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार एका महिलेला पुढे करू स्वत: पळून गेला, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली. ते जयपूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

मोदींच्या काळात थेट नवा करार करण्यात आला. मात्र, हे करताना मोदींनी संरक्षण आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांचे आक्षेप ऐकून घेतले का, असा सवाल आम्ही सितारामन यांना विचारला. मात्र, या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, राफेल व्यवहारात मोदींनी अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये मिळवून दिले असतील, तर त्याचा न्याय होणारच, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

Most Popular

To Top