महाराष्ट्र

युतीची चर्चा गेली खड्ड्यात; शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- उद्धव ठाकरे

महासत्ता-  सरकारी यंत्रणेच्या सुस्त पडलेल्या अजगराला ढोसण्यासाठी मी फिरतोय.  या वर्षीचा दुष्काळ गंभीर आहे, पण शिवसेना खंबीर आहे.  युतीची चर्चा गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत केली.

तुम्ही शिवसनेनेचा दुष्काळ हटवा मी तुमचा दुष्काळ हटवतो.  दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशनमध्ये कपात झाली, हे खरं आहे की खोटं? दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येऊन गेलं, मात्र तुमच्या हातात काही मदत पडली का? पीकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

  दरम्यान, जर न्यायालय निर्णय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो, असंही त्यांनी सांगितलं. खरं बोलून एकही मत मिळालं नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत  असे ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Most Popular

To Top