सहाय्यक आयुक्त सचिन माडावी, दत्तामामा बारगजे ,राजेश बांगर, ओम गिरी, मोहिमेत सहभागी
बीड : महासत्ता ऑनलाइन – आयुष्यभर बाबांच्या खांद्याला खांदा लावून कुष्ठरुग्णाची सेवा करणाऱ्या श्रध्येय साधनाताई आमटे यांची आज जयंती. आणि शांतिवन चे अध्यक्ष श्री सुरेशकाका जोशी यांचा आज वाढदिवस आज बीड मध्ये कोरोना संकटकाळात पुकारण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी शांतिवन कम्युनिटी किचन च्या माध्यमातून रोज 250 लोकांना 500 जेवण देणारी तीन अन्नछत्र सुरू करून जयंती आणि वाढदिवस साजरा करण्यात आले.
समाज कल्याण आयुक्त श्री सचिन माडावी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तामामा बारगजे, दीपक नागरगोजे, राजेश बांगर, बालकामगार प्रकल्प अधिकारी ओमप्रकाश गिरी, तत्वशील कांबळे, संतोष राख, बाजीराव ढाकणे, आदींनी आज या सेवा मोहिमेत सहभाग घेतला. सैनिक शाळा, बालेपिर मधील दोन वसाहतीत हे केंद्र सुरू करण्यात आले आहेत .
