महासत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे आज रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करत हा शरद पवारांचा शिष्य आणि ठाणेकर योद्धा आज अखेर घरी परतला आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय मित्रमंडळी समाधान व्यक्त होत आहे.
मतदारसंघासाठी दिवस-रात्र २४ तास राबणारे जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी खरंतर हा अत्यंत कसोटीचा काळ होता. मात्र स्वतःचे गुरु आदरणीय शरद पवार यांच्यापासून संकटाशी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा घेतलेल्या आव्हाडांनी कोरोनाशी दोन हात करत अखेर विजयश्री खेचून आणली. पवार नामक गुरुचा कानमंत्र या शिष्याने खरा करून दाखवला. प्रचंड आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड प्रतिकार शक्तीच्या जोरावर हा विजय आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.