केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निवासस्थानी शांततेचे दिवे लावून बुद्ध पौर्णिमा साजरी
मुंबई : महासत्ता ऑनलाइन – दि. 7 – नक्षलवाद; दहशतवाद आतंकवाद माओवाद या सर्वांवर भगवान बुद्धांचा शांततेचा अहिंसेचा विचार हाच उपाय आहे. जगात आता कोरोना हजारो लोकांचे जीव घेत आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठीभगवान बुद्धांनी सांगितलेल्या शांततेच्या विचारानेच मात करता येईल.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. आम्ही जिंकणार आहोत कोरोना विरुद्ध चे युद्ध कारण आमच्या सोबत आहे भगवान गौतम बुद्ध अशी यावेळी शीघ्र कविता ना रामदास आठवले यांनी सादर केली. भगवान गौतम बुद्धांची 2564 वी जयंती ना रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानी आज साजरी झाली. बुद्ध मूर्तीला पुष्प वाहून; त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन तसेच सायंकाळी शांततेचे प्रतिकात्मक दिवे मेणबत्ती लावून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले पुत्र जित आठवले तसेच कुटुंबीय आणि धुमधडाकाफेम अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे, रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर;राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भगवान बुद्धांनी शांती; अहिंसा बहुजन हिताय बहुजन सुखाय चा माणसाला माणसाशी जोडणारा जगात पहिला लोकशाहीचा विज्ञानाचा विचार मांडणारा बौद्ध धम्म जगाला दिला. शांततेतून संयम आणि एकाग्रता येते.शांत विचारामुळे लॉक डाऊन चे नियम संयमाने पाळून आपण कोरोनाला हरवू शकतो. त्यामुळे शांततेचे विचाराचे प्रतीक म्हणून शांततेचे दिवे ; मेणबत्ती लावून आज बुद्ध पौर्णिमा आम्ही साजरी केली असे ना रामदास आठवले म्हणाले. कोरोना ला हरविण्यासाठी घरीच राहा; बाहेर गर्दी करू नका असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे. कोरोनाचे संकट जगातून नष्ट होवो अशी अपेक्षा व्यक्त करीत ना रामदास आठवले यांनी बुद्ध जयंती च्या शुभेच्छा दिल्या आहेत.