अन्न – धान्यासह भाजीपालाही केला मोफत वाटप
परळी : महासत्ता ऑनलाईन – दि.०५, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परळी मतदारसंघात गोरगरीब – गरजू नागरिकांना त्यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून मदतीचा यज्ञ सुरू केला असून, आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप केले आहेत.
या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, मीठ, साखर, हळद, तिखट, मसाला आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
या कठीण काळात अनेक लहान मोठे उद्योग – व्यवसाय ठप्प असून हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये या उद्देशाने मोठे मदतकार्य उभारले आहे. ४० हजार किराणा किट सह जवळपास १० लाख रुपयांचा भाजीपाला शेतकऱ्यांकडून विकत घेत नागरिकांना मोफत वाटप करून मुंडेंनी दुहेरी दिलासा दिला आहे. तसेच रेशनकार्ड नसलेल्या अनेक नागरिकांना गहू, तांदूळ आदी धान्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले जात आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटापर्यंत परळी शहरातील प्रभाग १ मध्ये १००० किट, प्रभाग २ मध्ये १५०० किट व १५ क्विंटल तांदूळ, ३ मध्ये १५०० किट, ४ मध्ये १५०० किट, ५ मध्ये १३०० किट, ६ मध्ये १००० किट, ७ मध्ये १७०० किट, ८ मध्ये १७०० किट, ९ मध्ये १५०० किट, १० मध्ये १००० किट, ११ मध्ये ८०० किट, १२ मध्ये, १००० किट, १३ मध्ये १००० किट, १४ मध्ये १००० किट, १५ मध्ये १००० किट आणि प्रभाग १६ मध्ये १५०० किट वाटप केल्या आहेत.
ग्रामीण भागातील सिरसाळ्यात २००० किट वाटप केल्या आहेत तर नागापूर ५००, टोकवाडी १०००, कण्हेरवाडी ११००, घाटनांदूर १००० किट व १५ क्विंटल गहू, पिंपळा ५०० किट, धारावती तांडा व ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ६०० किट, जिरेवाडी ६००, सायगाव २५०, सातेफळ २५०, सुगाव १२५, तडोळा ७५, अंबासाखर ७५, वाघळा १२५, मूडेगाव ७५, वाघबेट ३७०, पिंपरी ३००, गाडेपिंपळगाव ५००, नंदागौळ ९२५, नांदगाव १२५, नांदगाव तांडा १२५, भारज १२५, सेलूअंबा १२५, राडी ३५०, गिरवली २००, पोखरी १२५, अकोला १२५, लिंबगाव १२५, लिंबगाव तांडा १२५, राडी तांडा १२५, वाघळा राडी ५०, धानोरा बुद्रुक १२५, जवळगाव १००० बरदापुर ५००, तर पट्टीवडगाव येथे ४०० कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले आहे.
नाथ प्रतिष्ठानने देणगी स्वरूपात मिळालेला १३० क्विंटल गहू, १०० क्विंटल तांदूळ मोफत वाटप केले असून परळी येथील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सुरू असलेल्या अन्नछत्रसाठी २१ दिवस पुरेल या हिशोबाने २१ क्विंटल गहू, १७ क्विंटल तांदूळ, ३.५ क्विंटल तूरडाळ आणि २१ तेलाचे डबे मोफत दिले आहेत.
त्याचबरोबर दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या ब्रदर्स, सफाई कामगार आदी ५०० व्यक्तींना, नगर परिषदेच्या ५०० स्वछता कर्मचाऱ्यांना, ४०० विट भट्टी मजुरांना, हातगाडी – रिक्षा चालवणाऱ्या २०० व्यक्तींना, हमाल ३००, केशकर्तन व्यवसायतील १०० तसेच वृत्तपत्र वितरण करणाऱ्या १०० हून अधिक व्यक्तींना या किराणा किट मोफत दिल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार मतदारसंघातील शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत पोचून घरपोच मदत देण्यासाठी नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांच्यासह नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी चोख नियोजनासह अथक परिश्रम घेत आहेत. त्यांनी आतापर्यंत ४० हजारांहून अधिक कुटुंबापर्यंत हे किराणा किट पोचवले असून अजूनही हे मदतकार्य सुरूच राहणार आहे.
मोठ्या शहरांसह जिथे आहेत तिथे मदत…
मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, लातूर अशा अनेक ठिकाणी काम करून पोट भरायला गेलेल्या लोकांच्या मदतीलाही धनंजय मुंडे धावून गेले आहेत. धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध ठिकाणी अडकलेल्या कुटुंबांना सुद्धा किराणा किट घरपोच मिळवून दिले असून या संकट काळात त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेबद्दल दाखवलेल्या या आपुलकी व दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.