महाराष्ट्र

माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, परंतु व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घाबरून दिल्लीला जाणेच महिनाभर थांबवले होते म्हणे. ही बाब सांगोवांगी नसून स्वतः पवारांनीच याबद्दलचा खुलासा शुक्रवारी केला. दिवंगत धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
दिल्लीला जायचे बंद का आणि कोणामुळे केले हे सांगताना पवार म्हणाले, “मध्यंतरी एक स्टेटमेंट आले की, माझे बोट धरून राजकारणात आलो. बोलणारी व्यक्ती अशी मोठी होती की, मी पुढे महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले…’ शरद पवारांनी बोट धरून राजकारणात चालायला शिकवले, असे वक्तव्य गेल्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले होते. याचा संदर्भ देत मात्र मोदींचे नाव न घेता पवारांनी खुलासा केला.
पवार म्हणाले, “माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, परंतु व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे. राजकीय निर्णय घेताना स्वच्छ भूमिका हवी. मात्र, प्रशासन चालवताना तुम्ही राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधी असता हे सूत्र घेऊन काम केले पाहिजे हा विचार यशवंतराव चव्हाणांनी आमच्या पिढीला शिकवला. त्याच व्यापक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात वावरत आलो.’ पवार म्हणाले, ‘निवडणूक संपल्यावर पुन्हा जिवाभावाची मैत्री जपली पाहिजे. राजकारणात असेच असले पाहिजे. बापूसाहेब काळदाते माझे मित्र होते. राजकारणात आम्ही विरोधी पक्षांमध्ये होतो. निवडणुकीदरम्यान बारामतीत भाषण करताना ते माझ्याविरोधात आक्रमक बोलायचे. भाषण संपल्यावर जेवायला माझ्या घरी यायचे. मीही औरंगाबादला प्रचाराच्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका करायचो. भाषणानंतर सन्मित्र कॉलनीत त्यांच्याकडे जेवून पुढे निघायचो. पक्षीय अभिनिवेश विसरून भूमिका घेणे समाजासाठी, राष्ट्रासाठी महत्त्वाचे असते.’ ‘कृषिमंत्री असताना परदेशातून गहू-तांदूळ आयात करावा लागला तेव्हा मी अस्वस्थ झालो. झोप लागत नव्हती. त्या वेळी मध्य प्रदेशच्या शिवराज चौहानांनी एवढे काम केले की गहू-तांदूळ उत्पादनात मध्य प्रदेश पंजाब-हरियाणाच्या पुढे नेऊन ठेवला. छत्तीसगडने तांदूळ उत्पादनात मोठी मजल मारली. गुजरातने उत्पादन वाढवले. या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे होते हा मुद्दा नव्हता. त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढवून देशाला सहकार्य केले. राष्ट्रीय गरज म्हणून मी त्यांना मदत करत होतो. अनेकदा मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत तिथल्या शेतकरी मेळाव्यांना जायचो. त्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत आल्यानंतर पंतप्रधानांच्या विरोधात आक्रमक भूमिका असायची. त्यावर माझी भूमिका अशी होती की त्यांची भूमिका त्यांनी मांडावी.’
‘एकटे’ नारायण राणे
विलासराव देशमुख यांचे लाडके असणारे धनंजय थोरात पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते होते. तरी सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांची जिवाभावाची मैत्री होती. त्यामुळेच सर्व पक्षांच्या नेत्यांनी या वेळी गर्दी केली. हा संदर्भ घेत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी टिप्पणी केली, ‘कार्यक्रमाला एकटे ‘नारायण राणे’ असते तरी कार्यक्रम ‘सर्वपक्षीय’ झाला असता.’ त्यांच्या या टिप्पणीला शरद पवारांसह सर्वांनी खळखळून हसून दाद दिली. – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घाबरून दिल्लीला जाणेच महिनाभर थांबवले होते म्हणे. ही बाब सांगोवांगी नसून स्वतः पवारांनीच याबद्दलचा खुलासा शुक्रवारी केला. दिवंगत धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
दिल्लीला जायचे बंद का आणि कोणामुळे केले हे सांगताना पवार म्हणाले, “मध्यंतरी एक स्टेटमेंट आले की, माझे बोट धरून राजकारणात आलो. बोलणारी व्यक्ती अशी मोठी होती की, मी पुढे महिनाभर दिल्लीला जाणेच टाळले…’ शरद पवारांनी बोट धरून राजकारणात चालायला शिकवले, असे वक्तव्य गेल्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले होते. याचा संदर्भ देत मात्र मोदींचे नाव न घेता पवारांनी खुलासा केला.
पवार म्हणाले, “माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, परंतु व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे. राजकीय निर्णय घेताना स्वच्छ भूमिका हवी. मात्र, प्रशासन चालवताना तुम्ही राज्याचे किंवा देशाचे प्रतिनिधी असता हे सूत्र घेऊन काम केले पाहिजे हा विचार यशवंतराव चव्हाणांनी आमच्या पिढीला शिकवला. त्याच व्यापक दृष्टिकोनातून सार्वजनिक जीवनात वावरत आलो.’ पवार म्हणाले, ‘निवडणूक संपल्यावर पुन्हा जिवाभावाची मैत्री जपली पाहिजे. राजकारणात असेच असले पाहिजे. बापूसाहेब काळदाते माझे मित्र होते. राजकारणात आम्ही विरोधी पक्षांमध्ये होतो. निवडणुकीदरम्यान बारामतीत भाषण करताना ते माझ्याविरोधात आक्रमक बोलायचे. भाषण संपल्यावर जेवायला माझ्या घरी यायचे. मीही औरंगाबादला प्रचाराच्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका करायचो. भाषणानंतर सन्मित्र कॉलनीत त्यांच्याकडे जेवून पुढे निघायचो. पक्षीय अभिनिवेश विसरून भूमिका घेणे समाजासाठी, राष्ट्रासाठी महत्त्वाचे असते.’ ‘कृषिमंत्री असताना परदेशातून गहू-तांदूळ आयात करावा लागला तेव्हा मी अस्वस्थ झालो. झोप लागत नव्हती. त्या वेळी मध्य प्रदेशच्या शिवराज चौहानांनी एवढे काम केले की गहू-तांदूळ उत्पादनात मध्य प्रदेश पंजाब-हरियाणाच्या पुढे नेऊन ठेवला. छत्तीसगडने तांदूळ उत्पादनात मोठी मजल मारली. गुजरातने उत्पादन वाढवले. या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे होते हा मुद्दा नव्हता. त्यांनी अन्नधान्य उत्पादन वाढवून देशाला सहकार्य केले. राष्ट्रीय गरज म्हणून मी त्यांना मदत करत होतो. अनेकदा मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत तिथल्या शेतकरी मेळाव्यांना जायचो. त्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत आल्यानंतर पंतप्रधानांच्या विरोधात आक्रमक भूमिका असायची. त्यावर माझी भूमिका अशी होती की त्यांची भूमिका त्यांनी मांडावी.’

‘एकटे’ नारायण राणे

विलासराव देशमुख यांचे लाडके असणारे धनंजय थोरात पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते होते. तरी सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांची जिवाभावाची मैत्री होती. त्यामुळेच सर्व पक्षांच्या नेत्यांनी या वेळी गर्दी केली. हा संदर्भ घेत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी टिप्पणी केली, ‘कार्यक्रमाला एकटे ‘नारायण राणे’ असते तरी कार्यक्रम ‘सर्वपक्षीय’ झाला असता.’ त्यांच्या या टिप्पणीला शरद पवारांसह सर्वांनी खळखळून हसून दाद दिली.

माझ्याबद्दल अनेकदा गैरसमज होतात, परंतु व्यक्तिगत जीवनात मैत्री ठेवली पाहिजे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top