CCleaner हे Avast Antivirus कंपनीचे प्रॉडक्ट आहे . ज्याचे आतापर्यंत २ अब्ज डाउनलोड आहेत.
CCleaner हे फ्री असल्यामुळे आणि कैचे मेमरी ,रॅम ,इंटरनेट कूकीज ,रेजिस्टरी क्लीन करण्यासाठी विंडोज यूजर या सॉफ्टवेअर चा वापर करतात .
जर तुम्ही CCleaner वापरात असलं तर लक्ष देऊन वाचा. १५ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान CCleaner उपडेट किंवा डाउनलोड केले असेल तर तुमच्या कॉम्पुटर मध्ये मालवेअर ने प्रवेश केला आहे.
Kaspersky कंपनीच्या च्या मते या मागे अतिशय सराईत अशा Axiom चायनीज हॅकर ग्रुप चा हात आहे.
Cisco Talos कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे कि ज्या सर्व्हर वर CCleaner होते आणि यूजर्सनी तेथून डाउनलोड केले ते सर्व्हर अज्ञात हॅकर्स ने हॅक केले. अंदाजे २ कोटी युसर्सनी असे केले आहे. हॅकर्सनी सर्व्हर हाक करून तेथे मालवेअर असलेले सॉफ्टवेअर ठेवले. आणि यूजर्सनी ते डाउनलोड केले. या हॅक मुळे हॅकर्सना तुमच्याबद्दल ची खालील माहिती मिळतेय.
१. कॉम्पुटरचे नाव
२. कॉम्पुटरवर इन्स्टॉल असलेली सर्व सॉफ्टवेअर, विंडोज अपडेट्स ची माहिती.
३. कॉम्पुटरची IP व MAC पत्ता
४. अतिरिक्त माहिती जसे कि प्रोसेस विथ ऍडमिन विशेषाधिकार.
आपल्या PC मधून मालवेअर कसा काढाल:
ज्या युसर्स ने CCleaner v 5.33.6162 डाउनलोड केले आहे किंवा उपडेट केले आहे त्यांनी v 5.3५ डाउनलोड करावे. त्याची लिंक खास महासत्ता च्या वाचकांसाठी देत आहोत.