लॉकडाऊन काळात मागील ३६ दिवसापासून सुरू असलेले मदत कार्य जनतेसाठी ठरत आहे मोलाची मदत…
संभाजीनगर : महासत्ता ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने मागील २८ मार्च पासून कोरोना च्या संकट काळात अडकलेल्या गोर गरीब लोकांना,वयोवृद्ध,अपंग नागरिकांना व बाहेरगावाहून शिक्षण व नोकरीसाठी आलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली ही आपत्कालीन हेल्प लाईन सेवा कार्य करीत आहे.
या मध्ये शहरातील कैलास नगर, संजय नगर,म्हाडा कॉलनी,दादा कॉलनी, पडेगाव,नागेश्वर वाडी, समता नगर,उस्मानपुरा, पिसांदेवी, छावणी,विद्यापीठ परिसर तसेच विविध भागातील विद्यार्थी वर्ग यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे,जवळपास रोज सकाळी व सायंकाळी २५० ते ३०० लोकांचे जेवणाची व्यवस्था मनसेच्या वतीने करण्यात आली आहे व हे जेवणाचे डबे सुद्धा या सर्वांना घरपोच पोहचविले जातात,शहरातील जैन मंदिराचे नक्षीकाम करण्यासाठी पर राज्यातील ४-५ कामगार आले होते परंतु अचानक लॉक डाऊन लागल्याने त्यांचे कामही थांबले व त्यांचे जेवणाचे हाल होत होते.
त्यावेळी त्यांनीं मनसे हेल्प लाईन मध्ये फोन करत मदत मागितली त्यावेळी त्यांना काही प्रमाणात धान्य व किराणा सुद्धा देण्यात आला.
शहरातील काही भागात वयोवृद्ध अपंग व्यक्तींना मोफत घरपोच औषधी सुद्धा पुरवण्यात येत आहे. या मध्ये शुगर पेशंट,बिपी पेशंट,
लहान मुलांचे औषधी किंवा इतर आजारावरील औषधी करता वयोवृद्ध अपंग व काही हलाखीची परिस्थिती असणाऱ्या महिला सुद्धां औषधी करता हेल्प लाईन कडे फोन करून संपर्क करत असतात,त्या नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलेली चिठ्ठी घेउन मनसेचे प्रतिनिधी मेडिकल मधून स्वतः ती औषधी घेऊन त्या संपर्क करणाऱ्या व्यक्तीला स्वतः मोफत घरपोच जाऊन देत आहे.मागील आठवडा भरपासून जवळपास १.५ लाखा पर्यंतच्या औषधी गोळ्या मनसेने या हेल्प लाईन सेवेच्या माध्यमातून वाटप केल्या आहेत.
या हेल्प लाईन सेवे मध्ये जिल्हा संघटक वैभव मिटकर,संदीप कुलकर्णी,गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर,संकेत शेटे, विशाल आमराव,वंदे मातरम् सेनेचे समीर लोखंडे,सतबिर सिंघ रंधवा,अमित दायमा,विशाल कारभारे,प्रविण मोहिते,चेतन पाटील,शुभम रगडे,वृषभ रगडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. या हेल्प लाईन सेवेच्या माध्यमातून मनसे समाजातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांची भूक भागवत आहे व अनेकांना औषधी पुरवत आहे. तसेच लॉक डाऊन संपेपर्यंत ही हेल्प लाईन सेवा कार्य करीत राहील असे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांनी सांगितले आहे.