परभणी , संदीप रनखांबे :- धनगर समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य शाखा परभणी वतीने रोजगार विषयक मार्गदर्शन व धनगर समाज समाज बांधवांचा समाज मेळावा परभणी शहरातील वसमत रोड वरील शिव छत्रपती सभागृहात 27 रोजी सम्पन झाला.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्धेश पत्रिकेची वाचन करून झाली, या उद्धेश पत्रिकेचे वाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवीचंद्र राजाभाऊ काळे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. मारोतराव मामा बनसोडे सभापती समाज कल्याण, जिल्हापरिषद परभणी यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मा. सौ. श्रद्धताई येडगे महिला प्रदेशाध्यक्षा महाराष्ट्र राज्य शिवाय कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. राहुल सोलंकर (प्रसिध्द उद्योगपती) यांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाचे पाहूणे म्हणून मा. सुरेश भुमरे ,मा. बापूराव गमे, मा. गिन्यानदेव दंडवते ,मा. भारत आव्हाड ,मा. संजय गलांडे, मा.सुरेश कानडे, मा.मुंजाजी पारधे ,मा. विठ्ठल काळे ,मा.राधाजी पारधे ,मा. दत्तराव खरात, मा. अशोक मुळे , मा. नारायण बनसोडे, मा.सौ. गंगासगरताई वाळवंट, मा.लक्ष्मणराव हारकळ यांची उपस्थिती लाभली.
सदरच्या कार्यक्रमात समाजातील प्रसिद्ध उद्योगपती मा. राहुल सोळंकर यांनी जवळपास चाळीस मी. उद्योगपर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित तरूणांना समाज माध्यमांचा उपयोग बदलत्या परिस्थिती नुसार उद्योग, व्यापारासाठी करावा असे आवाहन केले. तसेच उद्योगात उद्भवणाऱ्या अडचणी विषयीही मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याखानास युवक तसेच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शिवाय या मेळाव्यास मा. मारोतराव मामा बनसोडे यांनीही संबोधीत केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मा. माणिक जेवणार परभणी जिल्हाध्यक्ष मराठवाडा संपर्क प्रमुख धनगर समाज सेवा संस्था यांनी केले होते.सदरच्या कार्यक्रमात धनगर समाज सेवा संस्थेच्या विविध पदांवर परभणी जिल्ह्यातील तसेच लातुर जिल्यातील औसा आणि शीरुर तालुक्याची जबाबदारी कार्यकरत्यांना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश होलपाते ,राजकुमार दंडवते, सुरेश नरवाडे, रवी नरवाडे, पप्पू ढोले, सोपान हारकळ, रामा जावडे,सतिश आव्हाड, रामा पवार, राजेश पारधे आदिंनी परिश्रम घेतले.
“कार्यक्रमाची सांगता सूत्रसंचालन रवीचंद्र राजाभाऊ काळे यांनी राष्ट्रगीत म्हणून केली”