परळी | राज्यातील पॉवरफुल राजकारणी धनंजय मुंडेंचा जन्मभुमीत अभुतपुर्व नागरी सत्कार
_परळीकरांनो साथ आणि आशिर्वाद द्या; राज्यात परिवर्तन घडवुन दाखवतो-ना.धनंजय मुंडे_
परळी वै.दि.20………………….22 वर्षाच्या राजकारणात अनेक चढ उतार आले, जय पराजय पाहिले. मात्र इतका अभुतपुर्व आणि नागरी सत्कार होण्याची आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. परळीकरांच्या या प्रेमाला मी कदापीही विसरणार नाही. कोणतेही पद मिळाले तरी उतणार नाही, मातणार नाही जनसेवेचा घेतलेला वसा टाकणार नाही. राज्यात परिवर्तन घडविण्याची ताकद इथल्या मातीत आणि माणसात आहे ते मी करून दाखवतो तुम्ही फक्त त्यासाठी साथ आणि आशिर्वाद द्या अशी भावनिक साद विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी घातली.
लोकमत या वर्तमान पत्राने धनंजय मुंडे यांचा नुकताच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर 2018 पॉवरफुल राजकारणी अर्थात प्रभावशाली नेता हा पुरस्कार देवुन गौरव केल्याबद्दल परळी शहरात आज त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेत्या माजी खासदार सौ.रजनीताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.अमरसिंह पंडित, आ.सतिष चव्हाण, आ.मधुसुदन केंद्रे, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.रामराव वडकुते, माजी आ.सौ.उषाताई दराडे, माजी आ.पृथ्वीराज साठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, रिपाईचे नेते धम्मानंद मुंडे, जिल्हा परिषद सदस्य संजय दौंड, देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ.रेखाताई फड, परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, काँग्रेसचे अनिल मुंडे, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, राहुल सोनवणे, परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, ना.धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती.रूक्मिणबाई मुंडे, यांच्यासह बीड जिल्ह्यातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
नागरी सत्कार समितीच्या वतीने भव्य सत्कार, मानपत्र देऊन गौरविण्यात आल्यानंतर बोलतांना ना.धनंजय मुंडे अतिशय भावुक झाले होते. आज हा सोहळा पाहण्यास स्व.अण्णा, स्व.मुंडे साहेब असते तर त्यांची ही छाती अभिमानाने फुलुन गेली असती. वा रे पठ्या म्हणुन त्यांनी ही पाठ थोपटली असती हे सांगताना ते गहिवरून आले होते. राजकारणाच्या सुरूवातीपासुन आपल्या कारकिर्दीचा आढावा भाषणात मांडतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री.शरदचंद्रजी पवार आणि श्री.अजितदादा पवार यांनी संधी दिली नसती तर आज मी या ठिकाणी उभा दिसलो नसतो असे सांगत त्यांच्या बद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. संपुर्णपणे राजकारण विरहीत भाषण करतांना त्यांनी कठिणातल्या-कठिण प्रसंगी जिवाची बाजी लावुन साथ देणार्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
सत्ता नसतांनाही 500 कोटी रूपयांचा सोलार प्रकल्प या मतदारसंघासाठी आणला आहे. सत्ता आल्यानंतर परळीचे संपुर्ण रूप मला बदलुन टाकायचे आहे. केवळ परळीचाच नव्हे तर संपुर्ण बीड जिल्ह्याचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. परळीच्या माणसाची मोठी शक्ती आणि ताकद आहे. या ताकदीच्या बळावरच मी आज या पदावर पोहोचलो आहे. मला राज्यात परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी तुम्ही साथ आणि आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले. आपल्याला मिळालेला हा पुरस्कार परळीतील जनतेला समर्पित करीत असल्याचे सांगताना हा गौरव माझा नसुन परळीकर जनतेचा असल्याच्या भावना ही त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सौ.रजनीताई पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे स्वागत करतांना धर्मनिरपेक्षतेची पताका हाती घ्या असे आवाहन केले. धनंजय मुंडे हे लंबी रेस का घोडा आहेत अशा शब्दात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांचे कौतुक केले तर धनंजय मुंडे हे परळीच्या मातीतील हिरा आहेत त्याला चमकावण्याचे काम पवार साहेबांनी केल्याचे आ.रामराव वडकुते म्हणाले. धनंजय मुंडेंवर होणार्या आरोपांना उत्तर देताना मनसेचे सुमंत धस यांनी सुर्य एका हाताने कधीही झाकत नाही. मुंडे साहेब तुम्ही काम करीत रहा अशा शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे हे उद्याचे मंत्री असल्याचे सांगितले तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांनी बीड जिल्ह्याचा अभिमान अशा शब्दात धनंजय मुंडे यांचा गौरव केला. बाबुराव पोटभरे यांनी देशातील विदारक परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर अधिक नेटाने लढा द्यावा असे आवाहन केले तर रिपाईचे धम्मानंद मुंडे यांनी ही शुभेच्छा व्यक्त केल्या. आजचा दिवस हा सुवर्ण योग असल्याचा उल्लेख नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे यांनी आपल्या प्रास्तावीक भाषणात केला.
मोंढा मैदानावर 10 वाजेपर्यंत चाललेल्या या सत्कार सोहळ्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. भाषणा नंतर जवळपास एक तास शहरातील 50 हुन अधिक संघटनांनी ना.धनंजय मुंडे यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, उपनगराध्यक्ष आय्युब भाई पठाण, मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान मुंडे, पंचायत समिती सभापती सौ.कल्पना मोहन सोळंके, अंबाजोगाई पंचायत समिती सभापती सौ.मिना शिवहार भताने, उपसभापती पिंटु मुंडे, तानाजी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंद देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, तालुकाध्यक्ष अॅड.गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकरी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, युवकचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, प्रा.डॉ.मधुकर आघाव, माऊली गडदे, माणिकभाऊ फड, शरद मुंडे, राजपाल लोमटे, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, प्रा.विनोद जगतकर, लक्ष्मण पौळ, निळकंठ चाटे, जानिमियॉ कुरेशी, युवक नेते अभय मुंडे, नितीन कुलकर्णी, रेश्माताई गित्ते, अर्चना रोडे, रणजित चाचा लोमटे, आंदीसह नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, पक्षाचे पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————–
*क्षणचित्रेः-*
1. आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती रूक्मिणबाई मुंडे या आज प्रथमच जाहिर कार्यक्रमात उपस्थित होत्या. विशेष म्हणजे त्यांनी सामान्यांमध्ये बसुन आपल्या मुलाचे कौतुक पाहिले ते पाहताना त्यांचे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले होते.
2. श्रीमती रजनीताई पाटील यांनी इस्लामपुर या आपल्या माहेरी धनंजय मुंडेंची गाजलेली सभा सांगुन सासरच्या माणसांचे माहेरी झालेल्या कौतुकाने मी आनंदुन गेले असे सांगितले.
3. सत्कार सोहळ्याच्या वेळी अभुतपुर्व आतिषबाजींनी मोंढा मैदानाचा परिसर प्रकाशमय आणि दनाणुन गेला होता.
4. संपुर्ण शहर धनंजय मुंडेंच्या स्वागत कमानी डिजीटल बॅनर्स आणि वर्तमान पत्रांच्या जाहिरातींनी भरून गेले होते.
———————————————-