लातूर – जाती-जातीमध्ये फुट पाडणाऱ्या एमआयएमला अडविण्याची हिम्मत अर्धी चड्डी घालणाऱ्यामध्ये नाही, असं वादग्रस्त वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. ते लातूरमध्ये बोलत होते.
गृहखात्यात हिंमत असेल तर त्यांनी हे करून दाखवावं पण त्यांच्यात ही हिम्मत नाहीये असंही ते म्हणाले.
मोदीचं राज्य फसवाफसवीचं आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल केली असून २०१९ मध्ये तुम्ही शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवून द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.
