नागपूर– भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर दिला असून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले आहेत.
फडणवीस सरकार लॉर्ड मेकॉले या इंग्रज अधिकाऱ्याने राबवलेलं शैक्षणिक धोरण राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपनं नेहमीच लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा विरोध केला कॉग्रेस सत्तेवर असतांना आम्ही मराठी शाळा वाचवण्यासाठी लढलो, पण कॉग्रेसची धोरणं सध्या भाजपच राबवत असल्याचं दिसतंय, असं ते म्हणाले.