महाराष्ट्र

भाजप-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली..

आत्ताच नवीन निर्वाचित झालेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये चांगलीच वाक्ययुद्ध सुरू झालेले दिसून येते. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की आणखीन पण माझ्या संपर्कात महाराष्ट्र वर्किंग कमिटी चे काँग्रेसचे काही आमदार संपर्कात आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना नवनिर्वाचित महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की भाजपकडे कोणताही स्वःचा कार्यकर्ता नसून दुसऱ्यांचे आमदार घेऊन भाजप सत्तेचे स्वप्न पाहत आहे.
त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्त्याची व नेते नसून दुसऱ्या पक्षातील आमदारांना घेऊन ते सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत, परंतु यापुढे भाजपची सत्ता येणार नसून आमच्या आघाडीची सत्ता येणार आहे.
दरम्यान, चंद्रकांत दादा यांनी संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या आमदारांचे आत्ताच नावे जाहीर करणार नाही, मग काही मजा राहणार नाही असं सांगताना त्यांनी संपर्कात असणाऱ्या आमदारांचा नाव सांगण्यास सध्या टाळले योग्य वेळ आल्यानंतर मी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देईल असं बोलताना चंद्रकांत पाटिल यांनी सांगितले.

Most Popular

To Top