लेख :- ज्ञानेश्वर बडे ( वाढदिवस विशेष )
लढाईत जिकलेला बहुजन तहात हरला…
खोट्या प्रतिष्टे साठी कुठल्याही थराला जाण्याची राजकारण्यांची मानसिकता या बद्दल सर्व सामान्य माणसात प्रचंड चीड आहे. त्यात प्रचंड मेहनत करून दोन वेळच्या रोजी रोटीची पूर्तता करण्यात शेतकरी अपयशी होत आहे , सर्वसामान्य माणूस पूर्ण हवालदिल होत आहे.
मनुवादी लोकांनी बहुजनांना भुरळ घालात, शिवरायांचे नाव घेऊन हि लोक सत्येत आली ,सत्येत आल्या नंतर खरे नेते नाथाभाऊ खडसे यांना बाजूला करत जातीचा निकस लावत मुख्यमंत्री निवड केली. देवेंन्द्रजी व खडसे सोडले तर भाजप मध्ये मुखमंत्री पदाला लायक कोणीही नाही ही जरी परिस्थिती खरी असली तरी खडसे “मनुवादी”नाहीत म्हणून ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत हे वास्तव आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी यांची प्रतिमा रावणाची करून हे रामराज्य असल्याचा आभास निर्माण केला ,यासाठी तमाम हिंदूंना एकवटून राज्य मिळवलं आणि सुरु होत गेलं हिंदू राज्यच वर्चस्व आणि ते मनुवाद्यांनी मिळवलं , आणि लढाईत जिकलेला बहुजन तहात हरला.
राजकारण हुकूमशाहिकडे…
मोदी लाटेत प्रचंड लोकप्रियता मिळवून हे सरकार सत्येत आले आणि राष्ट्रवादी व काँग्रेस ची मस्ती लोकांनी उतरवली असे हे लोक सांगू लागले. प्रचंड आश्वासनांचा पाऊस पडला पण ती पूर्ण करताना नाके नऊ येऊ लागल्यानी ह्या सरकारची तारांबळ उडाली . लोकांना दिलेले शब्द पूर्ण होत नाहीत हे दिसल्यावर लोकांचा या सरकार वर रोष वाढू लागला. काँग्रेस, राष्ट्रवादी च्या चुकीच्या धोरणामुळे हे सरकार अडचणीत असल्याची अफवा मनुवादी फौजा सोडू लागल्या सर्व सामान्य माणसाची दिशाभूल केली.
मनुवाद्यांचा धनंजय मुंडे हेच कर्दनकाळ..
बीड च्या राजकारणात स्वतः चा वेगळा ठसा उमटून प्रचंड प्रामाणिक , निरपेक्ष काम करणारे बहुजन समाजाचे नेते धनंजय मुंडे पुढे येऊ लागले, मराठा व ओबीसी समाजातील बीड जिल्यातील जातीवादाचा त्यांनी अंत केला , बहुजन युवकांची मोट बांधली ,आन मोहीम वळाली राज्याकडे .पवार साहेबानी राज्याचे नेतृत्व दिले प्रचंड निराशेतील बहुजन जनतेला धनंजयजी मुंडे यांनी आशा दिली , राज्यभर सरकार विरोधात रान उठवले ,या सरकार मधील मनुवादी घाबरले आणि बहुजनांच्या या पोराने जर मनुवाद्यांच्या राज्याला सुरुंग लावला तर, आणि या लोकांनी त्यांना बदनाम करण्याचा डाव केला , त्यासाठी मदत घेतली IBN भोकमतच्या राजकारणासाठी हापापलेल्या मनुवादी दलाल पत्रकाराची , की ज्यांनी यापूर्वी भगवान गडावर ही शिवराळ भाषा वापरली होती , त्या बदल्यात भाजपा माझा या वाहिनेने त्याची हकाल पट्टी केली होती. शहानिशा न केलेली क्लिप घाईघाईने दाखवून मोकळा झाला , आणि पेशवाईतल्या कुणाची शाबसकी मिळवली कुणास ठाऊक ,धनंजय मुंडे यांच्याच जातीचा हा पत्रकार हाताखाली धरून याला त्यांच्या विरोधात परळी मतदार संघातून भाजप कडून विधानसभेला उभा करून वंजारी समाजाचे नेतृत्व त्याच्या कडे देण्याचा मनुवाद्यांचा डाव आहे , अशा इलसी व्यक्तीची आम्ही निवडणुकीसाठी परळी स्वागत करत आहोत.
आरोपाचे अभिनंदन
आदरणीय पवार साहेब वरती अनेकांनी आरोप केले , त्याच कारण होत की पवार साहेब प्रचंड लोकप्रिय होते मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण चर्चेत येऊ हा समज रूढ होत गेला. तोच धागा पकडत मुंडे वर आरोप करण्यात आले ते स्वतःच्या राजकीय म्हत्वाकांक्षे पोटी . मुंडे याना हल्लाबोल मधील लाखो युवकांची मिळणारी प्रचंड साथ हि होती; असल्या आरोपाणी तर नेतृत्व उजळून निघते या निमिताने नेतृत्वाला चकाकी मिळाली.
बहुजनांना नेतृत्व…
स्व.बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेबा नंतर राज्यात आजतागायात सर्वात लोकप्रिय नेतृत्व, सर्वात संघर्षशील नेतृत्व म्हणून मुंडे पुढे आले . या निमित्याने संभाजी राजे , संत तुकाराम महाराज, स्व.गोपीनाथ मुंडे याचा खून करून त्यांना देव बनवून तो खून पचवलेल्या मनुवाद्यांचा हा धनंजय मुंडे नावाचा वाघ कर्दनकाळ ठरेल यांच्या खुनाचा बदला बहुजनांच्या जागृतीतून मिळेल ही मला अपेक्षा आहे .कारण स्वतःच्या आरोपाची नार्को टेस्ट करा , माझे सर्वाधिक वाईट चिंतवणाऱ्या व्यक्तीकडून माझी चौकशी करा म्हणणारा भारताच्या राजकारणातील पहिला संघर्ष योद्धा म्हूनून इतिहास ना.धनंजय मुंडे यांची नोंद घेईल. जातीपातीचे राजकारण सोडून बहुजन समाज धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारू लागला असून अशा या लोकनेत्यास 2019 ला सर्व बहुजन एकवटून शिरपेचात मुख्यमंत्री पदाचा मनाचा तुरा रोवून आजवरच्या बहुजन अन्यायाचा कर्दनकाळ म्हणून नेतृत्व स्वीकार करूया.
ना.धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हे मनुवाद्यांच कपट , या कटात पायऱ्यापासून शिखरा पर्यंत आप्तस्त असल्याने वेदना , प्रभू श्रीरामावर हि हीच घाणेरडी चाल स्वकीयांनी केली पण शेवटी श्रीराम इतिहासात अजरामर झाले , आता तर राम वनवासात जाणार नाहीत तर भगवान बाबांच्या आशीर्वादाने बहुजनांचे राज्य उभा करतील आणि लोकनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 2019 साली धर्मनिरपेक्ष विचारसरणीची स्वकीयांच्या या कटाला होळीच्या पवित्र अग्नित जाळून “शिवशाही” ऊभा राहील यात माझ्या व जनतेच्या मनात शंका नाही.