माझा जिल्हा

सलग पस्तीस वर्षाची महापूजा व कामगार स्नेह मिलनाची परंपरा जपनारे- ग्रँट रोड पोस्ट ऑफिस

         मुंबई : दिनांक 4 मार्च 2017 रोजी ग्रँट रोड पोस्ट ऑफिस पूजा समिती ने महापूजा व कामगार स्नेह मिलनाचे आयोजन केले होते .1982 पासून ची अनेक वर्षाची ऑफीस च्या पुजेची परंपरा पूजा समितीने या वर्षी हि जपली . यावेळी दुपारी 1.00 महाआरती ,नंतर महाप्रसाद ,कामगार स्नेहमिलन असा कार्यक्रम पार पडला. पुजेसाठी या वेळी नवदाम्पत्य श्री व सौ वावेकर यांची पुजेसाठी निवड केली होती.

नियमित उत्कृष्ट सेवा देनारे हे मुंबईच्या मध्यवर्ती सुशिक्षित भागात असलेले पोस्ट ऑफिस आहे .या पुजेमुळे कामगार व त्यांचे कुटुंब , ग्राहक, एजेंट यां वेळी मोठ्या प्रमाणात एकत्र येतात .सहकारा ची भावना ,तसेच  नव्याने शुभ कार्यारंभ करण्याची कामगार वर्गाला या पुजेने प्रेरणा व विश्वास मिळत असतो.

कार्यक्रमास  सोहळा यशश्वी करणाऱ्या पोस्टल फॅमिली ,उपस्थीत व प्रमुख पाहुणे यांचे पोस्ट मास्टर श्री हेमंत मोरे साहेब यांनी आभार मानले.

सलग पस्तीस वर्षाची महापूजा व कामगार स्नेह मिलनाची परंपरा जपनारे- ग्रँट रोड पोस्ट ऑफिस
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top