मुख्य बातम्या

मी आणि मोदी चांगले षटकार ठोकतो, छगन भुजबळ म्हणाले.. आम्ही बॅटसमनना बाद करतो

नाशिक– मी आणि मोदी चांगले बॅटसमेन असुन चौकार, षटकार ठोकतो, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगताच….आमच्याकडे चांगले गोलंदाज  आहेत. आम्ही बॅटसमनला बाद करतो, असं उत्तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

मी कुठल्याही पक्षा सोबत असलो तरी छगन भुजबळ हे माझे जवळचे मित्र आहेत. महात्मा फुले यांच्या कार्याचा वसा छगन भुजबळ यांनी घेतला असून बहुजन समाजासाठी त्यांचे कार्य सातत्याने सुरू असाही आठवलेंनी या वेळी सांगितलं.

२०१९ ची मॅच जिंकण्यासाठी आमचा सराव सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि मी चांगली फलंदाजी करतो. फलंदाजी करतांना आम्ही नेहमीच चौकार आणि षटकार लगावतो.” यावर छगन भुजबळ यांनी आमच्याकडे चांगले गोलंदाज असून आम्ही चांगले बॅटसमन बाद करू शकतो अशी टिपणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

Most Popular

To Top