मुख्य बातम्या

छगन भुजबळ ठाम, लोकसभा निवडणूक लढवणार नाही!

नाशिक– मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही म्हणजे नाही असं मत राष्ट्र वादी चे नेते छगन भुजबळ म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढविणार, लोकसभा तर निवडणूक तर नाहीच लढवणार. विधानसभा की विधानपरिषद याचा निर्णय पक्ष घेईल..असे छगन भुजबळ म्हणाले .

येवला मतदारसंघाने माझ्या अडचणीच्या काळात मला साथ देऊन स्वीकारले. मतदारांनी तीनदा येथून निवडून दिले.त्यामुळे येवलेकरांचे उपकार मी विसरू  शकणार नाही,” असे भुजबळ यावेळी म्हणाले.

येवल्याविषयी कुठेही कोणी काही वाईट बोलले तर मला वाईट वाटते . आजही मंत्रालयासह राज्यात येवला आणि भुजबळ यांचे समीकरण कायम असून काही अधिकारी येवला म्हटले की भुजबळ म्हणून टेबलावर वर असलेली फाईल एक तर खाली ठेवतात अन्यथा फाईल वर काढून मंजूर करतात. त्यामुळे भुजबळांचे येवलेकरांशी एक अतूट नाते आहे,” असेही ते म्हणाले .

Most Popular

To Top