मुख्य बातम्या

निवडणूकीत कोण कुणाला आडवे करतो ते बघूच- उदयनराजे

मुंबई– राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी बोलताना उदयनराजे मानले, काही जण बोलतात कोणीही चालेल पण उदयनराजे नको, अगदी मला आडवे करायचं चाललय, पण येणाऱ्या निवडणुकात कोण कुणाला आडवे करतेय ते पाहू, असे ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढता विरोध पाहता उदयनराजे यांनीही पलटवार करण्याची खेळी सुरू केल्याचे संकेत आज दिले आहेत

मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी या भेटीगाठी असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. मात्र, आजपर्यंत कामांसाठी मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या उदयनराजे यांनी आज मंत्र्याच्या दालनात जावून भेटी घेतल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातारा लोकसभेत उदयनराजे यांची आगामी निवडणूक कोणत्या चिन्हावर होणार याची चर्चा रंगली असतानाच त्यांनी मंत्रालयात येवून मुख्यमंत्र्याची चर्चा केल्याने राष्ट्रवादीतला पक्षांतर्गत कलह वाढीस लागण्याचे संकेत आहे.

Most Popular

To Top