जळगाव– जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण’ अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण’ असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण’ अंधार देणारा ठरला.