मुख्य बातम्या

पक्षाचं सांगता येत नाही मात्र तुम्ही सोबत रहा; सुजय विखेंचंं आवाहन

अहमदनगर- लोकसभा निवडणूक जागा वाटपात काय होईल ते नंतर ठरेल, पक्ष मला न्याय देईल की नाही हेही आत्ता सांगता येत नाही, मात्र लोक माझ्यासोबत राहतील. जे लोक आमच्यासोबत राहतील त्यांना विखे कुटुंबाची आयुष्यभर मदत होईल,असं डाँ.सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

राजकारणात घराणेशाही आहे, आमच्यावरही आरोप होतात, पण लोक स्वीकारतात. काही ठिकाणी चौथी पिढी राजकारणात आहे. आम्ही लोकांच्यातील कार्यकर्ते आहोत. लोकसभेला पक्ष उमेदवारी देईल का नाही हे सांगता येत नाही, मात्र श्रीगोंदेकरांनी माझ्यासोबत राहावे,” असे आवाहन त्यांनी केलं.

राजकारणात आलो ते कुणाच्या डोक्यावर बसून नव्हे, अथवा सत्ता भोगण्यासाठीही नाही. सामान्यांना न्याय देण्यासाठी लढत आहे. श्रीगोंदयात कुकडीच्या पाण्यासाठी खूप आंदोलने झाली. आम्ही उत्तरेत पाण्यासाठी सुप्रिम कोर्टात गेलो. आपल्या भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा न्याय देण्यासाठी मागे हटणार नाही. संधी द्या. पक्षाचे सांगता येत नाही, पण आपण सोबत रहा,” असंही ते म्हणाले.

Most Popular

To Top