मुख्य बातम्या

गोव्यात भाजपला मोठा धक्का बसणार, भाजप नेत्याचा इशारा !

गोवा – काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला अच्छे दिन येतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु यावरुनच आता भाजपमध्ये बंड होणार असल्याचं दिसत आहे. सत्ताधारी भाजपा गोव्यातील मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. परंतु गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांना हा निर्णय पटलेला नाही त्यामुळे त्यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. मी माझे पत्ते आता उघड करणार नाही. मी पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाही असे अनेकांना वाटते. पण मला पक्षाने गृहित धरु नये असा इशारा पार्सेकर यांनी दिला आहे.

दरम्यान गोवा भाजपा अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोपटेंना पक्षात प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून पार्सेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपा गोव्यातील मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे गोव्यात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Most Popular

To Top