पुणे- हडपसरचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्यावरील खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी चक्क तक्रारदारापुढे लोटांगण घेतल्याचे समोर आले आहेत. फिर्यादी रवींद्र बर्हाटे यांनी एक सीसीटीव्ही फुटेज जारी केला आहे. आमदार योगेश टिळेकर हे खंडणीचा गुन्हा मागे घेण्यासाठी बर्हाटे यांच्या हाता-पाया पडताना दिसत आहेे.
आमदार टिळेकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळे टिळेकरांच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे ते आता माझ्या हातापाया पडत असल्याचा दावा रवींद्र बर्हाटे यांनी केला आहे.
दरम्यान, तक्रारदार रवींद्र बर्हाटे यांच्या तक्रारीवरून आमदार टिळेकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आमदार टिळेकर यांनी खंडणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच रवींद्र बर्हाटे हे आपल्यापेक्षा वयाने मोठे असल्यानेच आपण त्यांना नतमस्तक झालो, असेही योगेश टिळेकर यांनी सांगितले आहे.
