आष्टी (दि. 20) : स्थानिकच्या ‘सेटलमेंट किंग’ म्हणवल्या जाणाऱ्या माजी राज्य मंत्र्यांनी शासन दरबारी चकरा मारुन केवळ स्वार्थासाठी चार छावण्यांना मंजुरीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीची अट घातली. राष्ट्रवादी काँग्रेसने न्यायालयात पाठपुरावा करत ही जाचक व स्वार्थी अट रद्द करून आणत माजी राज्यमंत्री व पालकमंत्र्यांना न्यायव्यस्थेने दणका दिला. जनावरांच्या चाऱ्यातसुद्धा इतके खालच्या दर्जाचे राजकार करणारे नेते खासदार आमदार म्हणून हवे आहेत की शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या कुटुंबातून अनुभवातून घडलेले बजरंग सोनवणेंसारखे नेते जिल्ह्याला खासदार म्हणून हवे आहेत ते जनतेनेच ठरवावे;’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश आबा शिंदे यांनी आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे बोलताना केले आहे.
आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचा आज आष्टी तालुक्यात सतीश आबा शिंदे, बाळासाहेब काका आजबे, महेंद्र तात्या गर्जे आदी नेत्यांसोबत झंझावाती जनसंपर्क दौरा सुरू असून त्यांनी तालुक्यातील डोंगरगण, म्हसोबाची वाडी, सुलेमान देवळा, दादेगाव, अंभोरा, सालेवडगाव, आंबेवाडी, धानोरा, वाघळूज इत्यादी गावांना भेटी देत येथील जनतेशी थेट संवाद साधला. थेट जनतेत मिसळणारा शेतकरी- सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून बजरंग बप्पा यांच्या प्रसिद्धीचा आलेख झपाट्याने वाढत असून, बैठकांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.
जनसंपर्क दौऱ्यादरम्यान सुलेमान देवळा येथील चारा छावणीला भेट देत तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकसभेचा उमेदवार चारा छावणीत पोहोचल्याने तेथिल शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सर्व मंडळींचे स्वागत केले. बजरंग बप्पांचा साधेपणा पाहून कमालीचा उत्साह आणि एक वेगळाच आपलेपणा शेतकरी बांधवांमध्ये दिसून आला.
सालेवडगाव येथील बैठकीदरम्यान ‘समोरचा उमेदवार आणखी रिंगणात उतरलाही नाही तोपर्यंतच शेतकरी पुत्र असलेले बजरंग बप्पा जिल्ह्याच्या टोकापर्यंत वाड्या वस्त्यांवर जाऊन पोहोचले. सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करू शकणाऱ्या, सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडवण्याची प्रामाणिक इच्छा असणाऱ्या या आपल्यातल्या माणसाला संधी मिळाली असून या संधीचं सोनं करत बजरंग बप्पांना आष्टी तालुक्यातून सर्वाधिक लीड मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन सतीश आबा शिंदे यांनी यावेळी बोलताना उपस्थितांना केले.
या दौऱ्यादरम्यान बजरंग बप्पा सोनवणे यांनी जिल्ह्यातील घराणेशाहीला मोडीत काढत सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शरद पवारांनी उमेदवारी दिलेली असून आपल्याला जिल्ह्यातील जनतेने सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी दौऱ्यादरम्यान अंभोरा येथील माजी जि. प. सदस्य सुखदेव खकाळ, अशोक खकाळ, सुभाष खकाळ, नवनाथ खकाळ, शंकर ओव्हाळ, मिलिंद खकाळ, सतीश बोरकर; म्हसोबाची वाडी येथील शिवा शेकडे, कुंडलिक शेकडे, सुंदर शेकडे, राजू वामन, रामा काकडे, शंकर लांडगे, त्रिम्बक म्हस्के, राजेंद्र शेकडे, संदीप म्हस्के, सचिन गव्हाणे, संदीप शिंदे, पोपट रामगुडे, अविनाश बांदल, श्रीकांत गव्हाणे, डॉ. कांबळे, संदीप भगत, योगेश मोरे, शांताराम गव्हाणे; दादेगाव येथील गहिनीनाथ गीते, विनोद निंबाळकर, सुधीर यादव, तुळशीदास खोटे, राहुल जाधवर; तसेच सालेवडगाव येथील शिवाजीराव डोके यांच्यासह सरपंच महादेव डोके, उपसरपंच जयसिंग दहातोंडे, शंकर विधाते, दत्ता दहातोंडे, बापूसाहेब डोके, ऍड. निंबाळकर, दादा गव्हाणे, भगवान जगताप, राम दहातोंडे, संदीप गुरसाळे, ऍड विनोद निंबाळकर, सूर्यभान रोकडे, रमेश जाधव, शाम कसले, शंकर विधाते, कैलास वांढेकर, ताज पठाण, पप्पू गवळी, पांडुरंग नाना हजारे, पोलीस पाटील विष्णू सोनवणे, महादेव हजारे, भगवान दहातोंडे, बाबुराव गायकवाड, यादव दहातोंडे, ऍड संभाजी दहातोंडे यांच्यासह सालेवडगाव आंबेवाडी, दादेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….