महाराष्ट्र

निधीच खर्च नाही,मग विकास कसा?

महासत्ता : ज्ञानेश्वर बडे – महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक बीड लोकसभा 2019.

आज भारतीय जनता पार्टी व शिवसेना बीडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत पत्रकाराने खासदार प्रीतम मुंडे यांना आपल्या फंडातील 50% निधीही रिलीज करून घेता आला नाही, असा प्रश्न केला असता पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सदर बातमी खोटी आहे. असं मला वाटतं त्यानंतर पत्रकाराने सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे असं वक्तव्य केल्यानंतर आमदार सुरेश धस यांची चांगलीच गोची झाली.

त्यानंतर त्यांनी खासदारांनी आणि पालकमंत्र्यांनी केलेली कामे ही त्यापेक्षाही अधिक ची आहेत. असं वक्तव्य करून सदर प्रश्नाला बगल द्यायचा प्रयत्न केला.

पत्रकारांनी पुन्हा त्यावर केंद्र सरकारकडून मिळालेल्या महामार्गाचे निधीे व रेल्वे याचे श्रेय खासदारांनी का घ्यायचे जर ते स्वतःचा वैयक्तिक निधी खर्च करू शकले नाहीत, असा प्रश्न केला असता केंद्रामध्ये भाजपाच सरकार आहे त्यामुळे निधी कोणता असो भाजप सरकार ने सर्व कामे केली आहेत अशी सारवा-सारव केली.

दरम्यान , राष्ट्रवादीचे उमेदवार मा. बजरंग बाप्पा सोनवणे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून आम्ही लोकसभा सहजतेने घेत नाहीत असेही वक्तव्य सुरेश धस यांनी केले. तर जिल्ह्यातील केलेल्या सर्व कामांचा विकासकामांचा आढावा त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत प्रखरपणे मांडला.
यावरून बीड लोकसभा ही प्रीतम मुंडे यांना सोपी नाही हे जाणवते.

Most Popular

To Top