मी पत्रकार

शिक्षणाचा बाजार …

एकविसाव्या शतकात व्यापारीकरण , औद्योगिकरण , उद्योगशीलता यांचा प्रचंड विस्तार झाला . शेतकरी , छोटे मोठे व्यावसायिक यांनी देखील व्यापारीकरणाच्या या प्रक्रियेत मोठा सहभाग घेतला . एकेकाळी छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यापारी आज मोठे उद्योजक म्हणून नावारूपाला आले . प्रत्येक गोष्टीचा नफ्याच्या दृष्टीने विचार केला जाऊ लागला आणि याच सगळ्या व्यापारिकरणाला शिक्षण क्षेत्र देखील अपवाद ठरलं नाही .
” विद्यादान ” या शब्दातच ” शिक्षण ” या संकल्पेनाचा मतितार्थ दडला आहे . भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून गुरूंच्या घरी जाऊन शिक्षणाचा वसा घेण्याची परंपरा होती . कालांतराने आपल्या विचारांच्या आणि जीवन शैलीत झालेल्या नूतनीकरणा मुळे शिक्षणाच देखील व्यापारीकरण झालं .
पूर्वीपासून चालत आलेल्या सरकारी शाळांकडे ” ” येथे शिक्षणाचा दर्जा घसरला “” या सबबीखाली पालकांनि दुर्लक्ष केलं . अर्थात ही सबब काही अंशी खरी देखील आहे . पण येथे लक्षात घेण्याचं कारण अस की ; शाळांचा दर्जा घसरलेला नसून , पात्रता नसताना किंवा वशिलेबाजी मुळे सरकारी शाळांमध्ये झालेली शिक्षक भरती जबाबदार आहे . अर्थात काही सरकारी शाळा याला अपवाद देखील आहेत , जिथे आजही उत्तम शिक्षण दिल जात तेही अगदी वाजवी फी मध्ये जे सर्वसामान्य लोकांना परवडत . त्यामुळेच सरकारी शाळांमध्ये जर पालकांना पुन्हा एकदा आकर्षित करून घ्यायचे असेल तर शिक्षक देखील उत्तम प्रशिक्षित असण गरजेचं आहे म्हणजे येथील शिक्षणाचा दर्जा उंचावेल . अर्थात हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे .
पण या सगळ्याचा फायदा मात्र अनेक खाजगी शिक्षण संस्थांनी उचलला . इंग्रजी ही काळाची गरज असल्याने खाजगी शाळांमधील प्रशिक्षित शिक्षकांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शना खाली मुलांना शिक्षण देण्यास पालकांनी पसंती दर्शवली . आपल्या पाल्यांच्या दृष्टीने हे करणं अगदी योग्यच आहे .
पण कालांतराने मात्र शिक्षण संस्थेचे रूपांतर एखाद्या उद्योग संस्थेत झाल्याचे निदर्शनास येईल . अवाजवी फी , मुलांना वह्या पुस्तक , गणवेश शाळेतून घेण्याची सक्ती , शिवाय इतर शालेय उपक्रमांची वेगळी फी या सगळ्या मध्ये पालकांना अक्षरशः भरडून घेतलं जातं .
शिवाय शाळाच नव्हे तर खाजगी क्लासेस मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देखील प्रवेश परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या . एखाद्या नामांकित शाळेत किंवा खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये मुलांना प्रेवेश मिळणं हा पालकांचा देखील स्टेटस आयकॉन बनला . अगदी नर्सरी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देखील हजारो रुपये आकारले जाऊ लागले व ” विद्यादानाच ” रुपांतर ” व्यापारीकर ” मध्ये झालं .
शिक्षणाच्या बाबतीत सतर्क असलंच पाहिजे पण त्याच बरोबर शिक्षणाचा दर्जा देखील उत्तम असण गरजेचं आहे . केवळ जास्त फी आकारली जाते म्हणजे शिक्षण देखील तसच असेल व सरकारी शाळा मोफत म्हणजे येथे शिक्षणाचा दर्जा नाही ही मानसिकता बदलली पाहिजे .
पालकांनी शिक्षणाकडे अगदी डोळसपणे बघण्याची गरज आहे . त्यामुळेच”” प्रामाणिक शिक्षणसंस्था “”आणि “‘व्यापरिकण “”, केवळ नफा मिळवण्यासाठी स्थापित झालेल्या शिक्षण संस्था यातील फरक ओळखून मगच निर्णय घेणे गरजेचे आहे . तरच हा “” शिक्षणाचा बाजार “” कुठेतरी थांबेल .

लेख : तेजल सावंत .

Most Popular

To Top