मी पत्रकार

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं?

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं?

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं?

महासत्ता :-  लायसन्स काय किंवा बँकेत डिडी बनवणं काय आत्तापर्यंत या गोष्टी वेळ खाऊपणाच्या होत्या. त्यावरून एक म्हण खूप प्रचलित आहे. ‘सरकारी काम आणि १० वर्षं थांब.’ पण आता तुम्हाला १० वर्षं थांबावं लागणार नाही. निदान ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तरी. सरकारी अधिकारी, मध्यस्ती आणि दलाल यांना चिरीमिरीही द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स आणि देशातल्या इतर भ्रष्टाचारावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आले आहेत. उदा. नायक, हिंदुस्थानी इ.इ. हिंदूस्थानीमध्ये कमल हसन हा आरटीओ अधिकारी दाखवला आहे. त्यामध्ये दाखवलेला संघर्ष हा भ्रष्टाचाराविरोधात असला तरीही हिरो हा आरटीओ अधिकारी दाखवल्याने त्याचा संदर्भ इथे द्यावासा वाटतो.
*या भ्रष्टाचाराला तुम्ही कंटाळला असाल, पैसे विनाकारण कोणाला द्यायचे नसतील तर थोडी तसदी तुम्हालाही घ्यावी लागेल. म्हणजेच संगणक साक्षर व्हायची. ते झालं की तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला लगेच हिरवा कंदिल मिळालाच म्हणून समजा.*

*काय करावं लागेल ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ?*
लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला राज्यपरिवहन विभागाच्या वेबसाइटवर जावं लागेल आणि तिथे उपलब्ध असलेला ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. तसेच तुमच्या वयाचा दाखला व अधिकृत ओळखपत्र तुम्हाला स्कॅनकरून साईटवर अपलोड करावे लागेल. हे झाले की पुढे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कंप्युटर टेस्टसाठी तारीख घेऊ शकता.
*ठरवलेल्या तारखेला तुम्ही आरटीओच्या कार्यालयात जाऊन पैसे जमा करू शकता. तसेच तिथेच तुम्हाला ऑनलाइन टेस्टही देता येईल. ती पास झालात की तुम्हाला लर्निंग लायसन्स दिले जाईल. त्यानंतर एक ते सहा महिन्यांत पुन्हा टेस्ट दिलीत की तुम्हाला कायमस्वरुपी लायसन्स देण्यात येईल.*
*30* रुपयात लर्निंग व *300*रुपयात कायमस्वरुपी लायसन्स
*लायसन्स बनवण्यासाठी दलालांना आठशे ते हजार रुपये टेकवून देखील वाट पहावी लागते. पण ऑनलाइन पद्धतीने तुम्ही केवळ ३० रुपयांत लर्निंग लायसन्स व ३०० रुपयांत कायमस्वरुपी लायसन्स मिळवू शकता. तुम्ही  पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता पण स्थानिक कार्यलयांमध्ये ऑनलाईन बँकींगचे सॉफ्टवेअर लिंक नसल्यास तुम्हाला कॅश भरावी लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यावर फी भरण्यासाठी तुम्हाला आरटीओच्या कार्यालयातच जावं लागेल. अर्थातच ऑनलाईन फी भरण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तरच.*

*मोबाईल फोनवरही बनवू शकता लायसन्स*
मोबाईलमुळे अवघं जग जवळ आलय. त्याला ड्रायव्हिंग लायसन्स कसा अपवाद असू शकतं. या माध्यमातून तुम्ही डुप्लिकेट लायसन्स, लायसन्स रिन्यू करणे, नव्याने लायसन्स काढणे, लर्निंग लायसन्स व कायम स्वरुपी लायसन्स काढणेही सहज शक्य झाले आहे.
*मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी खालील गोष्टी करा*.
आरटीओची वेबसाईट तुमच्या फोनच्या ब्राऊजरमध्ये उघडा. त्यानंतर लायसन्स कोणत्या प्रकारचे हवं आहे, ही माहिती तुमच्यासमोर येईल. आवश्यक ती माहिती भरल्यावर त्याची प्रिंट आऊट काढलीत की आवश्यक त्या कागदपत्रांसहित व लागणाऱ्या पैशांसहित तुम्हाला तो फॉर्म आरटीओ ऑफिसमध्ये देता येईल.

*तीन प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स असतात.*

*१. नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्स*
याची व्हॅलिडिटी ही वीस वर्षाकरिता असते. या लायसन्सवर तुम्हाला खाजगी गाड्या चालवता येतात. हे लायसन्स मिळवण्याकरता तुम्हाला पहिले लर्निंग लायसन्स मिळवावे लागते.
*२. ट्रान्सपोर्ट लायसन्स*
या लायसन्सची कालमर्यादा तीन वर्षे इतकी आहे. हे लायसन्स मिळाल्यावर तुम्ही धंदेवाईक गाड्या चालवू शकता. ज्या मुख्यतः पिवळ्या नंबरप्लेटच्या असतात.
*३. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट*
या लायसन्सची व्हॅलिडिटी फक्त एक वर्षाची असते. दर वर्षी तुम्हाला तुमचे लायसन्स रिन्यू करावे लागते. पण याचा फायदा असा की तुम्ही जगभरात कुठेही गाडी चालवू शकता.
*लायसन्स बनवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं*
ऑनलाईन लायसन्स बनवण्याकरता तुम्हाला ओळखपपत्र व फोटो आयडी प्रुफ लागतो. तर काही राज्यांत तुमच्या शिक्षणाचे सर्टिफिकेट व मेडिकल टेस्टही द्यावी लागते. अॅड्रेसप्रुफसाठी आपण,आधार कार्ड,लाईट बील, वोटींग कार्ड, पॅनकार्ड, अशी सोळा प्रकारची कागदपत्र देऊ शकतो.
*ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट*

एकदाका ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केलात की महिना भरात तुम्हाला ड्रायव्हिंगची परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाते व तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते.
*कोणाला व कसं दिलं जातं ड्रायव्हिंग लायसन्स*
ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी तुम्हाला स्थानिक आरटीओ ऑफिसमध्ये जावे लागेल. तसेच तुमचे भारतीय असणे आवश्यक आहे. तुम्ही मानसिक व शारिरीकरित्या सक्षम असायला हवे. ज्या वाहना करता अर्ज करत आहात त्याची वयोमर्यादा पूर्ण केलेली असावी.
*अपॉइंमेंट भेटल्यावर द्यावी लागते ही टेस्ट*
६० रुपयांत लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या विभागातल्या ट्रान्सपोर्ट ऑफीसमध्ये एक परिक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेमध्ये १० वैकल्पिक प्रश्न विचारतात
*लर्निंग लायसन्सवर गाडी चालवल्या नंतरच तुम्हाला पर्मनंट लायसन्स दिले जाते. त्याकरता तुम्हाला स्थानिक आरटीओ ऑफीसमध्ये फॉर्म नं. ४ भरावा लागतो.*
लायसन्स  मिळाल्यावर तुम्हाला अनेक ड्रायव्हिंगच्या नियमांचे पालन करावे लागते. तसेच लायसन्स घरपोच हवे असल्यास त्याकरता एका लिफाफ्यावर तुमच्या घरचा पत्ता व आवश्यक स्टँप चिटकवून तो त्यांना द्यावा लागतो.

संकलन :- नामदेव मुंडे , अंबाजोगाई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं?
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top