15 नोव्हेंबर : 19 पेक्षा जास्त कंपन्या फ्लाइंग कार बनवण्याच्या कामाला लागल्या आहेत. 2020 पर्यंत या कार आपल्याला उडताना दिसणार असं सांगितलं जातंय. या फ्लाइंग कारच्या प्रकल्पात गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांची कंपनी किट्टी हॉक आणि युरोपची सगळ्यात मोठी जहाज बांधणी कंपनी एयरबस यांचा समावेश आहे.
काय आहेत या फ्लाइंग कारची वैशिष्ट्यं?
– 2020 पर्यंत हवेत उडणाऱ्या या कारची आधीच बुकिंगही झाली आहेत.
– ही फ्लाइंग कार एरोमोबिलद्वारे बनवण्यात येणार आहे.
– ही फ्लाइंग कार दोन चाकी असणार आहे.
– गाडी चालू केल्यानंतर 3 मिनिटांमध्ये ती हवेत उडणार. तिची ड्राईविंग रेंज 700 किलोमीटर आणि हवेतली रेंज 750 किलोमीटर आहे.
– जमिनीवर या गाडीचा वेग 160 किलोमीटर आहे आणि आकाशातला वेग 360 किलोमीटर इतका असणार आहे.
एयरबस या कंपनीने या कारचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे या उडणाऱ्या कारची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.
उबरनही फ्लाइंग कार लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. नासाच्या मदतीने ते कार बनवणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यांची कार ‘उबरएअर’ या नावाने ओळखली जाईल.
चीन आणि जपानही फ्लाइंग कार बनवण्याच्या शर्यतीत आहेत.
भारतात कधी येणार फ्लाइंग कार?
– नेदरलॅण्डची कंपनी ‘PAL-V’ने 2018पर्यंत भारतामध्ये फ्लाइंग कार लॉन्च करणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी कंपनीने पेटंटही काढलं आहे.
– या कंपनीने पहिल्यांदा 2013 मध्ये फ्लाइंग कारची चाचणी केली होती. त्यामुळे ती कधी एकदाची आपल्या हातात येते याचीच सगळे जण वाट बघतायत.
आता या फ्लाइंग कारमुळे रस्त्यावरची गर्दी कमी होते का? आणि या कारने आपल्या पर्यावरणाला तर काही धोका होणार नाही ना, हेच पाहणं महत्वाचं आहे.