By
Posted on
महासत्ता :- ऊस उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जिल्हयात आज सरकारच्या तोंडाला काळीबा फासणारी घटना घडली आहे.
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे उसाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे गोळीबार केला. दोन शेतकरी गंभीर जखमी
झाले.या घटने नंतर खानापूर येथील आंदोलनास हिंसक वळण आले.
पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार तसेच गोळीबार करत 2 शेतकऱयांना गंभीर जखमी झाली.
धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
आपल्या न्याय हक्कासाठी शांततेने आंदोलन करणा-या नगर जिल्ह्यातील शेतक-यांवर बळाचा वापर करून गोळीबार करणा-या सरकारचा जाहीर निषेध. या सरकारला आता जनताच जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. याप्रकरणी नगरच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा.-धनंजय मुंडे @Dev_Fadnavis https://t.co/XQKB6yz09u
