By
Posted on
लातूर: शेतीमालाला भाव नसल्यामुळे गाज्यांची शेती करण्यासाठी शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्याला अर्ज
शिरूर-अंनतपाल तालुक्यातील हिसामाबाद येथील शेतकरी हमीद पटेल यांनी गांज्याची शेती करण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे. हमिद पटेल यांना ०.६० म्हणजेच दिड एकर शेती आहे. त्यामध्ये तुर, सोयाबीन, हरभरा ही पिकं घेतली जातात. पण सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे ही शेती परवडत नाही. सध्या गांज्याला चांगले भाव आहेत. त्यामुळे गांज्या शेती नफ्यात राहू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मला परवानगी द्यावी अशा प्रकारची माहिती त्यांनी अर्जात नमूद केली आहे.
