By
Posted on
सनी लिओनप्रमाणे सर्व महिलांनी आपल्या पुरुषांना खुश ठेवावे
आज, ८ मार्च रोजी जगभर ‘स्त्रीत्वा’च्या उत्सवानिमित्त महिला दिन साजरा होत असून ‘स्त्री’ शक्तीला ‘गूगल’नेही डूडलच्या माध्यमातून सलाम केला तर क्रिकेटपटू विराट कोहलीसह अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून’महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘महिला दिना’निमित्त वादग्रस्त ट्विटची परंपरा मात्र सतत वादग्रस्त टिप्पणी करत चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने कायम ठेवली आहे. ‘हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनचा आदर्श समोर ठेवा आणि पुरूषांना खुश ठेवावे, असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला आहे. एवढेच नव्हे तर महिला दिनाला पुरूष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरूषच हा दिवस जास्त साजरा करतात, असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

