महाराष्ट्र

वाचळ आमदार प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित.

वाचळ आमदार प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित.

         सोलापुर: लष्करी जवानांच्या कुटुंबीयांबाबत अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा, सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली.

परिचारकांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी ९ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर अध्यक्ष असतील.

सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक बडतर्फ केले जात नाही तोवर सभागृह चालू देणार नाही या विरोधकांच्या ठाम भूमिकेमुळे विधान परिषदेचे कामकाज बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले होते. परिचारक यांच्यावर कारवाई करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची व तोवर त्यांना निलंबित करण्याची तयारी सरकारकडून दर्शवण्यात आली होती. तसा ठराव आज सभागृहात मांडण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत निवेदन दिले.

‘परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सभापती रामराजे निंबाळकर हे या समितीचेअध्यक्ष असतील. तर या समितीमध्ये चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस आमदार नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, ‘लोकभारती’चे आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे आमदार शरद रणपीसे, शिवसेनेच्या आमदार आमदार नीलम गोऱ्हे, भाजपचे भाई गिरकर हे सदस्य असतील’, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनापर्यंत मांडण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

चौकशी समिती

अध्यक्ष – सभापती रामराजे निंबाळकर

सदस्य – चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, जयंत पाटील, कपिल पाटील, शरद रणपीसे, नीलम गोऱ्हे, भाई गिरकर

वाचळ आमदार प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित.
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top