By
Posted on
नवी दिल्ली : इतर टेलिकॉम कंपन्या आता जिओला टक्कर देण्यासाठी ग्राहकांसाठी विविध ऑफर बाजारात आणत आहेत. वोडाफोनने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता ओन्ली फॉर यू हा नवा प्लान आणला आहे.
ग्राहकांना या ऑफरअंतर्गत ३५२ रुपयांच्या रिचार्जवर ५६ जीबी डेटा ५६ दिवसांसाठी मिळणार आहे. एवढेच नव्हे तर डेटासोबत अनलिमिटेड कॉल्सचाही पर्याय ग्राहकांना मिळणार आहे. म्हणजेच केवळ ६ रुपयांत तुम्हाला १ जीबी डेटा मिळत आहे. तसेच एका दिवसाला एक जीबी डेटा तुम्हाला वोडाफोन कंपनी देत आहे. दरम्यान, ही ऑफर सर्वांनाच मिळणार नाहीये तर वोडाफोनच्या काही ग्राहकांना ही ऑफर मिळणार आहे.