शेती

शुन्य खर्च शेतीचा “बळीराजा ” पद्मश्री श्री सुभाष पाळेकर.

शुन्य खर्च शेतीचा "बळीराजा " पद्मश्री श्री सुभाष पाळेकर.

पद्मश्री श्री सुभाष पाळेकर

प्रस्तावना / ओळख

 

1)ह्युमस ( जीवन द्रव्य )
ह्युमस जमिनीला सुपिकता प्रदान करते. जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते.
काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून  प्रत्येक सजीवांचे  शरीर होय. काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु असतात. त्यामध्ये जंतू व बुरशींचा समावेश असतो (बॅक्टेरिया व फंगस). म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या  कुजण्याततून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी काष्ठ पदार्थांचा आच्छादन व सुक्ष्म जीवाणूंचे विरजन ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. जगामध्ये जेवढे  काही  सुक्ष्मजीवानूंचे विरजण (कल्चर) आहेत त्याम
ध्ये सर्वोत्तम विरजण भारतीय देशी गायिचे शेण आहे.
2) जमीन अन्नपुर्णा
जमिनीला वरून अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो हा कृषी विज्ञानाचा सिद्धांत खोटा आहे. निसर्गामध्ये जंगलातल्या कोणत्याही  झाडाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत नाही. अर्थात ही सगळे अन्नद्रव्य झाडांनी जमिनीतूनच घेतली असल्यामूळे जमिनीत काही नाही हे म्हणणे खोटे आहे. ह्याचा अर्थ जमीन  सगळयाच अन्नद्रव्यांनी संपृक्त  आहे. म्हणून जमीन ही अन्नपूर्णा आहे.
जमिनीच्या पृष्ठभागापासून आपण जसजशे खोल जातो तसतशी अन्नद्रव्यांची मात्रा वाढत जाते. ह्याचा अर्थ खोलवरची जमीन अन्नपूर्णा आहे. जंगलामध्ये सुद्धा हीच रचना असते.ज्या झाडांच्या पानांमध्ये कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही  त्यात ही सगळी अन्नद्रव्य जमिनीच्या खोलवरील  भागांतून  आपोआप मुळी पर्यंत पोहोंचतात पण आपोआप काहीही घडत नाही ह्याचा अर्थ ही सगळी खोलवरची अन्नद्रव्य खोल जमिनीमधून  मुळापर्यंत पोहोचोवणारी कोणती तरी  निसर्गाची यंत्रणा  असली पाहिजे? त्याशिवाय झाडाला अन्नद्रव्य पोहचू  शकत नाहीत . निसर्गाच्या चार प्रकारच्या यंत्रणा  आहेत ज्यात सर्व अन्नद्रव्यांची निर्मिती  होते.
1. काष्ठ पदार्थांच्या कुजण्यातून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य.
2. कॅपीलरी फोर्स(केशाकर्षण शक्ती)
3. सायक्लोनस (चक्रीवादळं)
4. गावराणी गांडुळांच्या हालचाली.

3) अन्नचक्र
निसर्गामध्ये अनेक अन्नचक्र असतात आणि प्रत्येक अन्नद्रव्य जिथून  निघाले तिथेच जाते.
कार्बोहाड्रेड, युरिया,अमोनिया,कर्बोदके
4)सुक्ष्मपर्यावरण ( मायक्रोक्लायमेट)
गांडुळ फक्त सुक्ष्मपर्यावरणातच काम करतो. जमिनीच्या जडणघडणी  मध्ये व सुपिकता निर्माण  होण्यामध्ये तसेच घनदाट जंगल उभे होण्यामध्ये देशी गांडूळांची सर्वोत्तम भुमिका असते. जर गांडुळं  नसती तर जंगलं  उभी झाली नसती व फळबागा उभ्या झाल्या नसत्या. गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व फळ झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते. गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण  गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही  दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात  व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून  जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते. हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते. परंतु गांडुळांच्या ह्या
सर्वोत्तम़ कामगिरीसाठी ,जमिनीच्या वर आणि  खाली एका विशिष्ट  परिस्थितीची आवश्यकता असते. त्या स्थीतीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
सुक्ष्मपर्यावरण  म्हणजे काय?
जमिनीच्या पृष्ठभागावर उभ्या दोन झाडांच्या दरम्यान जी हवा खेळते त्या हवेचे तापमान 25�सें. ते 32�सें. पाहिजे व त्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65% ते 72% असले पाहिजे व जमिनीच्या आत मध्ये अंधार, वाफसा, उब, व माया असली पाहिजे. ह्या एकूण एकात्मिक स्थीतीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
कृषी विदयापीठे खोटे बोलतात की, झाडांना पाणी पाहिजे. या उलट झाडांना पाणी नको, तर झाडांना वाफसा पाहिजे. जमिनीच्या आत दोन माती कण समुहांच्या दरम्यान जागा असतात त्या पोकळयांमध्ये पाण्याच अस्थित्व अजिबात नको तर त्याएैवजी त्या पोकळयांमध्ये 50% वाफ व 50% हवा यांच संमिश्रण  पाहिजे. या हवा आणि वाफ यांच्या आंतरसंबधांना वाफसा म्हणतात.
प्रत्येक सजीवाला  जगण्यासाठी परस्पर सहजीवनामधील उब आणि माया यांची आवश्यकता असते. तशी ती गांडूळांना  सुद्धा त्याची आवश्यकता असते. म्हणून
सुक्ष्मपर्यावरण तयार करण्यासाठी पुढील सहा यंत्रणा उभ्या केल्या पाहिजे.
1. तापमान 2. आर्द्रता 3. अंधार
4.वाफसा 5. उब 6. माया
ह्या सहा यंत्रणा  कामाला लावल्यानंतरच सुक्ष्मपर्यावरण तयार होते व त्यासाठी आपल्याला एकच काम केले पाहिजे ,ते म्हणजे जमिनीवर आर्इचा पदर, म्हणजेच आच्छादन झाकले  पाहिजे .
सुक्ष्मपर्यावरण उपलब्ध झाल्यानंतर जेंव्हा गांडुळ सक्रीय  होतात तेव्हा ते आपली समाधी भंग करतात आणि जमिनीच्या पृष्ठभागाकडे यायला लागतात. आपला सिद्धांत आहे की, खोलवरची अन्नद्रव्यांचा महासागर असते आणि गांडूळ जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर यायला लागतात तेव्हा ते, खोलवरील ही खनिज समृद्ध माती, वाळूचे कण, चुनखडी, आपल्या सोबत वर आणतात या जमिनीतील रोग निर्माण करणारे राक्षस जंतू खातात व त्यांना नष्ठ करतात. परंतु त्याच वेळेला जमिनीमध्ये असलेले उपयुक्त जंतू व बुर्शी गिळतात ,मात्र त्यांना  नष्ठ करीत नाहीत . उलट या जंतूना बलवान सचेतन व कार्यशील करुण विश्टेवाते वर जमीनिवरआणून सोडतात॰गांडुळाच्या आतडीमध्ये अशी काही  पिसार्इ यंत्रणा (ग्राईंडींग मशीन) असते की खाल्लेले  सर्व पिसून  काढले जाते. व त्यापसुन तयार झालेली विष्ठा, गांडुळ जमिनीच्या पृष्ठभागावर आणून रोपांच्या ,पिकांच्या मुळीपाशी आणून टाकतात. गांडुळ ज्या छिद्रामधून वर आलेत त्या छिद्रातून ते पुन्हा प्रवेश करत नाहीत तर दर वेळी दुसरे छीद्र पाडून  जमिनीमध्ये घुसतात व तिसर्या छीद्रातून वर येतात व विष्ठा जमिनीवर टाकतात. देशी गांडुळ जाता येता आपल्या शरिरांमधून वर्मीवाश ( फ्लूर्इड )स्प्रे करतात आणि छिद्रांच्या भिंती लिंपून  टाकतात. या स्त्रावामध्ये जीवाणूंच्या  जगण्याला  आवश्यक व मुळांच्या विकासासाठी आवश्यक विशिष्ट संजीवकं , पोषणद्रव्य , आमिनो आम्ल व प्रतिकारशक्ती वाढविणारे , प्रतीपिंड(अँटीबॉडीज) असतात. ही गांडुळ 24 तास जमिनीमध्ये खालीवर करत असतात व जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडत असतात. कितीही पाऊस पडला  तरीही संपूर्ण पावसाचे पाणी ह्या छीद्रांमधून झिरपल्या जाते व जमिनी अंतर्गत भुजलामध्ये संग्रहीत होतो. व नैसर्गिक पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन तयार होते.
गांडूळाच्या विष्ठेमध्ये काय असते. ?
देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन  ताकद आणि  स्फूर्ती  घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात.

जीवन द्रव्य )

ह्युमस जमिनीला सुपिकता प्रदान करते. जमिनीमध्ये जीवन द्रव्याचा प्रमाण जेवढ जास्त तेवढी जमिन सुपिक बनते. जीवन द्रव्याची निर्मिती काष्ठ पदार्थाच्या विघटनातून (कुजण्यातून) होते.
काष्ठ पदार्थ केवळ पिकांचे अवशेष नसून प्रत्येक सजीवांचे शरीर होय. काष्ठ पदार्थाचे विघटन करणारे अनंतकोटी सूक्ष्मजीवाणु असतात. त्यामध्ये जंतू व बुरशींचा समावेश असतो (बॅक्टेरिया व फंगस). म्हणजेच जीवन द्रव्याची निर्मीती, पिकांचे अवशेष सुक्ष्म जीवाणूंच्या कुजण्याततून होते. म्हणजेच ह्युमस च्या निर्मीतीसाठी काष्ठ पदार्थांचा आच्छादन व सुक्ष्म जीवाणूंचे विरजन ह्या दोन गोष्टीची आवश्यकता असते. जगामध्ये जेवढे काही सुक्ष्मजीवानूंचे विरजण (कल्चर) आहेत त्याम
ध्ये सर्वोत्तम विरजण भारतीय देशी गायिचे शेण आहे.
2) जमीन अन्नपुर्णा
जमिनीला वरून अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागतो हा कृषी विज्ञानाचा सिद्धांत खोटा आहे. निसर्गामध्ये जंगलातल्या कोणत्याही झाडाच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत नाही. अर्थात ही सगळे अन्नद्रव्य झाडांनी जमिनीतूनच घेतली असल्यामूळे जमिनीत काही नाही हे म्हणणे खोटे आहे. ह्याचा अर्थ जमीन सगळयाच अन्नद्रव्यांनी संपृक्त आहे. म्हणून जमीन ही अन्नपूर्णा आहे.
जमिनीच्या पृष्ठभागापासून आपण जसजशे खोल जातो तसतशी अन्नद्रव्यांची मात्रा वाढत जाते. ह्याचा अर्थ खोलवरची जमीन अन्नपूर्णा आहे. जंगलामध्ये सुद्धा हीच रचना असते.ज्या झाडांच्या पानांमध्ये कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही त्यात ही सगळी अन्नद्रव्य जमिनीच्या खोलवरील भागांतून आपोआप मुळी पर्यंत पोहोंचतात पण आपोआप काहीही घडत नाही ह्याचा अर्थ ही सगळी खोलवरची अन्नद्रव्य खोल जमिनीमधून मुळापर्यंत पोहोचोवणारी कोणती तरी निसर्गाची यंत्रणा असली पाहिजे? त्याशिवाय झाडाला अन्नद्रव्य पोहचू शकत नाहीत . निसर्गाच्या चार प्रकारच्या यंत्रणा आहेत ज्यात सर्व अन्नद्रव्यांची निर्मिती होते.
1. काष्ठ पदार्थांच्या कुजण्यातून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य.
2. कॅपीलरी फोर्स(केशाकर्षण शक्ती)
3. सायक्लोनस (चक्रीवादळं)
4. गावराणी गांडुळांच्या हालचाली.

3) अन्नचक्र
निसर्गामध्ये अनेक अन्नचक्र असतात आणि प्रत्येक अन्नद्रव्य जिथून निघाले तिथेच जाते.
कार्बोहाड्रेड, युरिया,अमोनिया,कर्बोदके
4)सुक्ष्मपर्यावरण ( मायक्रोक्लायमेट)
गांडुळ फक्त सुक्ष्मपर्यावरणातच काम करतो. जमिनीच्या जडणघडणी मध्ये व सुपिकता निर्माण होण्यामध्ये तसेच घनदाट जंगल उभे होण्यामध्ये देशी गांडूळांची सर्वोत्तम भुमिका असते. जर गांडुळं नसती तर जंगलं उभी झाली नसती व फळबागा उभ्या झाल्या नसत्या. गांडुळ 24 तास काम करतात, जमिनीच्या खोलवरील सुपिक,समृद्ध माती खातात व विष्ठेच्या रुपात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत आणून टाकतात व फळ झाडांच्या मुळांना उपलब्ध करून देतात. ही गांडुळांची विष्ठा अन्नद्रव्यांचा भंडार असते. गांडुळे जमिनीमध्ये वरखाली येण्याजाण्यामुळे जमिनीला अनंत कोटी छीद्र पाडतात.कारण गांडुळे जमिनीतून वर येताना ज्या छिद्रातून वर येतो त्या छिद्रातून खाली जात नाही दर वेळी नवे छिद्र करतो .त्यामुळे जमिनीत अनंत कोटी छिद्र पडतात व पावसाच संपूर्ण पाणी ह्या छीद्रांच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरते व भुजलामध्ये जमा होते. हे पाणी पावसाळा संपल्यानंतर केशाकर्षण शक्तीमुळे वर येते व पिकांच्या मुळांना पाणी व अन्न उपलब्ध होते. परंतु गांडुळांच्या ह्या
सर्वोत्तम़ कामगिरीसाठी ,जमिनीच्या वर आणि खाली एका विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. त्या स्थीतीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
सुक्ष्मपर्यावरण म्हणजे काय?
जमिनीच्या पृष्ठभागावर उभ्या दोन झाडांच्या दरम्यान जी हवा खेळते त्या हवेचे तापमान 25�सें. ते 32�सें. पाहिजे व त्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65% ते 72% असले पाहिजे व जमिनीच्या आत मध्ये अंधार, वाफसा, उब, व माया असली पाहिजे. ह्या एकूण एकात्मिक स्थीतीला सुक्ष्मपर्यावरण म्हणतात.
कृषी विदयापीठे खोटे बोलतात की, झाडांना पाणी पाहिजे. या उलट झाडांना पाणी नको, तर झाडांना वाफसा पाहिजे. जमिनीच्या आत दोन माती कण समुहांच्या दरम्यान जागा असतात त्या पोकळयांमध्ये पाण्याच अस्थित्व अजिबात नको तर त्याएैवजी त्या पोकळयांमध्ये 50% वाफ व 50% हवा यांच संमिश्रण पाहिजे. या हवा आणि वाफ यांच्या आंतरसंबधांना वाफसा म्हणतात.
प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी परस्पर सहजीवनामधील उब आणि माया यांची आवश्यकता असते. तशी ती गांडूळांना सुद्धा त्याची आवश्यकता असते. म्हणून
सुक्ष्मपर्यावरण तयार करण्यासाठी पुढील सहा यंत्रणा उभ्या केल्या पाहिजे.
1. तापमान 2. आर्द्रता 3. अंधार
4.वाफसा 5. उब 6. माया

जीवामृत: प्रमाण 1 एकर साठी:
200 लीटर पाणी + 10 किलो देशी गार्इचे शेन + 5 ते 10 लीटर देशी गाइचे गोमुत्र + 1 किलो गुळ किंवा 4 लिटर ऊसाचा रस +1 किलो बेसन + 1 मुठ बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व  संध्याकाळ काठीने ढवळावे.
महिन्यातून 1 ते 2 वेळा पिकांना  200 ते 400 ली. जीवामृत दयावे.
ते वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे.
फळझाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा :
पहिल्या वर्षी:पहिले 6 महिने 200 मिली जीवामृत प्रति झाड
व नंतरचे 6 महिने 500 मिली जीवामृत प्रति झाड
दुसऱ्या वर्षी: प्रती  झाड 1 ते 2 लिटर जीवामृत प्रति झाड
तिसरया वर्षी: प्रती झाड 2 ते 3 लिटर जीवामृत प्रति झाड
चौथ्या वर्षी: प्रती झाड 4 ते 5 लिटर जीवामृत प्रति झाड
पाचव्या वर्षी: प्रती झाड 5 ते 10 लिटर जीवामृत प्रति झाड
आणी त्यानंतर 5 लिटर प्रती झाड हे प्रमाण  कायम राहील
जिवामृताच्या फवारण्या:
1.खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर
पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत.
तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत.
शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक.
2.भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी
1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. नीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
3 री फवारणी : दुसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
100 लि. पाणी + 2.5 लि. आंबट ताक
4 थी फवारणी : तिसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत

5 वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र किंवा
150 लि. पाणी + 5 ते 6 लि. दशपर्णीअर्क
6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
150 लि. पाणी + 4 लि. आंबट ताक
7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
200 लि. पाणी + 6 लि.अग्नीस्त्र किंवा
200 लि. पाणाी + 8 ते 10 लि. दशपर्णीअर्क
शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसा
200 लि. पाणी + 6 लि. आंबट ताक किंवा
200 लि. सप्तधान्यांकुर अर्क

3.नविन फळबागांसाठी :प्रमाण  प्रती एकर
1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
100 लि. पाणी + 5 लि. जीवामृत
2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
150 लि. पाणी + 10 लि. जीवामृत
3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात  ठेवाव्यात.प्रतिमाह 200 लि. पाणी + 20 लि. जीवामृत
जीवामृत  व पाणी हे नेहमी दुपारी  12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या  बाहेर दयावे.

4.उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक :(वय 5 ते 10 वर्ष)
फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतात. म्हणून  जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या  पाहिजेत .
झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर
200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले
ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना  फवारणे.
झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून  कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात.
फळ लागल्या नंतर(फळ धारणा) सुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून  प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी
प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत
200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक
जीवामृत 48 ते 72 तासात तयार होते. तयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू  असते व संजीवकांची  निर्मीती अव्याहत चालू असते. परंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू  होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक  वापरू नये. फक्त जीवामृताची फवारणी करावी.
जीवामृताच्या फवारण्या का?

  • 1) जीवामृत हे जीवाणूचे  विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशक, विषाणू  नाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी, विषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
    2) कोणत्याही  झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्‍लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून  फोटान कणांचा रुपात  एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळयांनी जमिनीतून  घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5ग्रॅम अन्न निर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही  अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतो. काही  अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे  पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा  ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते. या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं .
    जेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.5ग्रॅम अन्न निर्मिती करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं  टनेज मिळतं . हा टनेज आपल्याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.5कॅलरी सूर्य ऊर्जा होय. म्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा जास्त मिळेल. पानांचा  आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.
    3) कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून  जाते व जीवाणूंना  व मुळयांना प्राण वायू मिळत नाही  व पिकं पिवळ पडतात  कारण जमिनीतून  नत्राचा पुरवठा थांबलेला असतो. अशा वेळी झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतात. एवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं  उपलब्ध करता.

घनजीवामृत : प्रमान 1 एकर साठी
100 किलो देशी गायिचे शेण किंवा 50 कि.देशी गायिचे + 50 कि. बैलाचे शेन + 1 कि. गुळ बारीक करून टाका. किंवा 2 लि. ऊसाचा रस + 1 किलो बेसन हे मिश्रन चांगले मिसळा व सावलीत ढीग लावा जेणे  करून ऊन व पाऊस त्यावर पडू  नये. वातावरणाचे  तापमान कमी असेल तर गोनपाट झाका आणि 48 तास ठेवा. 48 तासानंतर दोन वेळा खालीवर करा व उन्हात वाळत ठेवा. हे मिश्रन वाळल्यानंतर त्याला बारीक करून घ्या व पोत्यात भरून ठेवा.हे मिश्रन 1 वर्षा पर्यंत वापरता येईल.

बीजामृत

बीजामृत:प्रमाण 100 किलो बियाण्यासाठी
20 लीटर पाणी + 5 किलो देशी गायिचे शेन + 5 लीटर देशी गायिचे गोमुत्र + 50 ग्रॅम कळीचा चुना + मुठभर बांधावरची जिवाणू माती (चुना पाण्यात निवळु दया व नंतरच त्याला मिश्रणात टाका.)हे मिश्रण चांगले मिसळून  घ्या व ढवळतांना डावीकडून उजवीकडे ढवळा.ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाका व सावलीत रात्रभर ठेवा.दुसऱ्या दिवशी बीजसंस्कार करा.
बीजामृताचा वापर :
1.ग्रामीणी कुळातील पीकं(गवतवर्गीय)तृणवर्गीय धान्य पीकं (भात,गहू,ज्वारी,रागी,ऊस,बाजरी,मका इ.)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.
2.तेल वाण:(शेंगदाने व सोयाबीन सोडून)यापैकी ज्या पिकांची निवड केली असेल त्याचे बी घ्या, ते बी थोडे पसरा व त्यावर अंदाजाने बीजामृत टाका. दोन्ही हाताने बीज चोळा व सावलीमध्ये सुकवा आणी पेरणी करा.
शेंगदाने व सोयाबिन यांची टरफल खुप पातळ असतात व ती संस्कार करते वेळी टरफल निघण्याची  शक्यता जास्त असते.जेवढे बियाणे आहे त्याच्या 10% घनजीवामृत एका डब्यात भरा व हळुच हलवा व ते पेरा .
3.कडधान्ये:
कडधान्याचं बी घ्या.थोड पसरा व अंदाजाने बीजामृत शिंपडा,दोन्ही हाताने घासू नका त्यामुळे टरफल निघतात. तर दोन्ही हाताची बोटे पसरवा व बोटांनी हळूच  वरखाली करा व सावलीत सुकवा आणी पेरा.
4.केळी चे कंद: (ऊसाचे बेणे, अद्रक, हळदं)वेळूच्या टोपली मध्ये बेणे  घ्या व बेण्यासकट टोपले काही  सेकंद बुडवा आणि लगेच  लावणी करा.
5.भाजीपाल्याचे बी:(मिरची, टमाटर, वांगे, गोबी, फुलगोबी, कांदे, झेंडू …)यापैकी निवडलेल्या पिकाचे  बी घ्या त्याच्यावर थोडे बिजामृत शिंपडा  आणि हाताने संस्कार करा व सावलीत  वाळवा आणि  रोप वाटिकेमध्ये पेरा.
6.रोप लावणीच्या वेळी:रोप वाटिकेतून  रोप उपटल्या नंतर रोपांच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी करा.साळीच्या किंवा धनाच्या मुळया बिजामृतामध्ये बुडवा आणि लावा.
गुलाब, द्राक्ष, पानवेल, मिरी, पांढरी मिरी, पान पिंपरी, व्हेनिला, शेवगा, गिरिपुष्प  रताळं , समस्त  फांदी कलमा बिजामृतामध्ये बुडवा आणि लावणी करा.
फळ झाडांच्या बीया बीजामृतामध्ये संस्कार करून लावाव्यात.
नारळ, सुपारी यांचे अंकुर बाहेर येर्इपर्यंत बुडवुन ठेवा व लावा.
बीज  संस्कार का करावे ?
पावसाळयामध्ये किंवा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा अवकाळी  ढग येतात. त्यासोबत येणार्या  बुरशीचे अंडे  व जंतुच्या पेशी वारयासोबत वाहून येतात. हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे ती उघडया बियांवर बसतात. जर आपण या बियांवर संस्कार केले नाही  व आहे तसेच पेरले तर बियासोबत हे सगळे जमिनीत जातात व अनुकुल स्थिती मिळताच पसरतात व रोपांच्या मुळीमध्ये घुसतात व सगळया पानांवर चट्टे पडतात व पाने गळून पडतात. जमिनीमध्ये देशी गायचं शेन व गोमुत्र असल्यामुळे बिंयावरच्या सगळया बुरशी नष्ट होतात व गोमुत्र जंतुरोधक असल्यामुळे जंतुचा नायनाट होतो  व बी पुर्ण शुद्ध होते.

नैसर्गिक किटक नाशके
1. निमास्त्र : 1 एकरसाठी
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. देशी गार्इचे शेन + 10 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 कि. लींबोळी पावडर
नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नये. पाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी.
नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये. तयार झालेले द्रावण  तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवा. दिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी  पांढरी माशी, मावा, तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.

2. ब्रम्हास्त्र:
मोठया आळीसाठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी  + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
+ 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी  + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या  टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली  ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून  घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
1 ऐकर साठी प्रमाण
200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र
3. अग्नीअस्त्र : हे  बोंड आळी, घाटी आळी साठी
20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 500 ग्रॅम तंबाखू + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम गावरानी लसणाची चटणी
हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48
तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून  ठेवा.हे द्रावण  3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. अग्नीअस्त्र

4. दशपर्णी अर्क :
200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी
हे मिश्रन चांगले ढवळा, व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात 10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कि. तंबाखू पावडर + 1 कि. तिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि. करंजी ची पाने +
2 कि. सीताफळाची पाने + 2 कि. धोतऱ्यायाची पाने + 2 कि. येरंडीची पाने + 2 कि. बेलाची पाने फुलासकट + 2 कि. तुळशीची पाने मंजीरीसकट + 2 कि. झंडुचे  पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची पाने + 2 कि. टनटनी वा घानेरीची  पाने व फांदया सकट + 2 कि. गावरान पपर्इची पाने  + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 कि. ऋचकी ची पाने + 2 कि. कन्हेरिचे पाने + 2 कि. बाउचीच्या फांदया + 2 कि. तरोटयाची पाने + 2 कि. आघाडयाची पाने + 2 कि. शेवग्याची पाने + 2 कि. कंबरमोडी + 2 कि.जास्वंदाची पाने + 2 कि.डाळिंबाची पाने + 2 कि. हराळी

ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने  मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या  व दिवसातून एकदा ढवळा. ढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा. हे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
200 लि. पाणी + 6 ते 10 लि. दशपर्णीअर्क
बुरशी नाशके :
1. 200 लि. पाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
2. 100 लि.पाणी+5ते6लि.आंबटताक आंबट ताक हे बुरशी नाशक, विषाणू नाशक, संजीवक व जंतूरोधक आहे.
3. 5 कि. रानगौरी मोगरीने  बारिक करा, एका फडक्यामध्ये गाठडी बांधा व त्याला एक दोरी  बांधा. एक मजबूत काडी  घ्या व त्या दोरीचे  टोक काडीला बांधा व 200 लि. पाण्यात बुडवून ठेवा. 48 तासांनंतर पाण्यातून गाठडी बाहेर काडा व पिळून घ्या. ही कृती 3 ते 4 वेळेस करा. त्यानंतर पाणी ढवळून घ्या व फवारणीसाठी वापरा.
4. ऐका भांडयामध्ये 2 लि. पाणी घ्या, त्या मध्ये 200 ग्रॅम सुंठ पावडर टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.द्रावनाला आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया. दुसऱ्या  भांडयामध्ये 2 लि. दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी  येऊ दया व त्याला थंड होऊ दया.
200 लि. पाणी + सुंठ अर्क + थंड दुध
हे मिश्रण  चांगले ढवळा व दोन तास ठेवा. त्यानंतर गळून  घ्या व फवारणी  करा. हे द्रावन 48 तासांपर्यंत वापरावे. 1 एकरासाठी हे  पिकांसाठी टॉनीक आहे.

1. 200 लि. पाणी + 2 लि. नारळाचे पाणी
सप्तधान्यांकुरअर्क  :
ऐका छोटया वाटी मध्ये 100 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या  दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये
100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद + 100 ग्रॅम चवळी + 100 ग्रॅम मटकी +
100 ग्रॅम देशी हरबरा + 100 ग्रॅम गहू
ह्या सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी  टाका.  घरात ठेवा.
तिसरया  दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून  घ्या व एका  ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजवलेले पाणी फेकून  देऊ नका.
1 सेमी. मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा.
200 लि. पाणी + 10 लि. देशी गार्इचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका. हे मिश्रन 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गळून  घ्या व फवारणी करा.
टॉनीक फवारणीची वेळ:
दाणे  दुधावर असताना़, फळ किंवा शेंगा लहान असताना, पालेभाज्या काढण्याच्या 5 दिवस आधी,फुलं  कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.
निम मलम : खोडावर लावण्यासाठी
50 लि. पाणी + 20 लि. देशी गार्इचे गोमुत्र + 20 किलो. शेन
+ 10 किलो लिंबाच्या फांदया पानासकट चटणी मिश्रन चांगले ढवळा व गोणपाट झाका व 48 तास ठेवा. दिवसातून  दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर वापर करा व वर्षातून 3 ते 6 वेळा वापरा.
नोट : समजा निममलम उपलब्ध नसेल तर
देशी गार्इचे ताजे शेन + गोमुत्र मिश्रण  लावणे.
 अन्न्द्रव्ये

नत्राणू  नायट्रेटस

नत्राणू दोन प्रकारचे आहेत

1) सहजीवी नत्राणू (सीमबीयॉटीक)

2) असहजीवी नत्राणू (नॉन सीमबीयॉटीक)

सहजीवी नत्राणू:   रायझोबीयम द्विदल मुळयांच्या गाठीत बुरशी लेग्युमीनीसी परीवार

असहजीवी नत्राणू : एझोटो एक दल पिकांच्या मुळी जवळ असतात.

भात, गहू ,ज्वारी, बाजरी, मक्का, नाचनी, व तेल वर्गीय पिके.

त्याकरिता नेहमी मल्टीलेअर शेती करावी म्हणजे मुख्यपीक  एक दल किंवा तेल वर्गीय असेल तर त्यामध्ये द्विदल हे अंतरपीक  घेतले पाहिजे.

फॉसफेट : (स्फुरद)

1) एक कण स्फुरद (मोनोव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

2) द्विकण स्फुरद (डायव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

3) त्रिकण स्फुरद (ट्रायव्यालेंट कॅलशीअम फोसफेट)

प्रत्येक पिकाला एक कण स्फुरद पाहिजे. स्फुरादाचे विघटन करणारे जीवाणू

( स्फुरदाणू ) करतात.

 

पोटॅशिअम: (पोटॅश पलाश)

पोटॅश हा बहुकणा मध्ये असतो. पण पिकाला  एक कणा  पोटॅश लागतो. हा एक      कण विघटनातून मिळतो.

पोटॅश विघटक  बॅसीकस सीलीकस

थायोऑक्सीडंट गंधक देतो

मथकोरायजा बुरशी अन्नपुर्णा जीवाणू

ऑक्टोबर-नव्हेंबर महिन्यात किंवा मार्च, एप्रील, मे व जुन मध्ये हवेचे         तापमान वेगाने वाढतात करण सुर्यप्रकाशाची तीव्रता  7000 फुट कँडल           ते 12000 फुट कँडल एवढी  असते. या उच्चतापमान पातळीला वाढलेली     असते.     या आधिक तापमानामुळे पानांचे तापमान वाढते व पानांतील पाणी       बाष्पीभवन हवेत निघून  जाते. पानांमध्ये पाण्याची कमतरता होते व              त्यावेळेस पान मुळयांना संदेश  पाठवतात व अशावेळेस मुळी जमिनीतून        पाणी उचलते व पानांना देते. अशा तऱ्हेने बाष्पीभवनाचा वेग वाढतो व         जमिनीतला ओलावा झपाटयाने कमी  होते व शेवटी जमिनीतील पाणी               राहत नाही  व पाने  सुकायला लागतात.पानांच्या मागच्या बाजूला       अनंत      सुक्ष्मछिद्र असतात त्यांना (स्टोमॅटो) पर्णछिद्र म्हणतात. ही  पर्णछिद्र     सर्व     बाजुंनी सुक्ष्म पेशींनी वेढलेल्या असतात. या पेशी पाहिजे तेव्हा या पर्ण        छिद्रांची उघड झाप करतात. त्यामुळे पानांच्या हालचाली नियंत्रीत होतात.        या पर्णछिद्रांतुनच सुर्यप्रकाश घेतात व कर्बआम्ल(सी ओ टू व प्राण वायु बाहेर   पडते व पाण्याची वाफ सुद्धा निघते. प्रत्येक पिकांच्या पानांची सुर्यप्रकाशाची   तीव्रता  सहन करण्याची शक्ती वेगवेगळी असते. डाळिंब व द्राक्षांच्या पानांना   5400 ते 6000 फुट कँडल सुर्यप्रकाशाची त्रिवता सहन होते आणी जास्त     उष्णतामान असेल तेव्हा      पानांतून  होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी सुरक्षापेशी पर्णछिद्र बंद करतात.परंतु रासायनिक शेतीमध्ये व सेंद्रीय शेतीमध्येसुधा       पेशींना कामावर लावणारे संजीवकं पानात निर्माण होत नाहीत व त्यामुळे पर्ण   छिद्रांची उघड झाप होत नाही व पीक  धोक्यात येते. जीवामृतांमध्ये ही         संजीवक असल्यामुळे सुरक्षा पेशी जास्त उष्णतामान असेल तर छिद्र बंद         करतात. त्यामुळे पानांतून  होणारे बाष्पीभवन थांबवते व पिकांचे नुकसान         होत नाही

5)   सुर्यप्रकाश जेव्हा पानांवर पडतो तेव्हा सुर्यप्रकाशा सोबत पानांचे नुकसान     करणारे करकीरण(अल्ट्रावॉयलेट रेज्) पानावर पडतात त्यामुळे    पानामध्ये होणाऱ्या सगळया जैविक, जैवरासानिक व रासायनिक क्रिया        अनियंत्रीत होतात व पिकांचे नुकसान होते. जीवामृताच्या फवारणीमुळे    हेकसान टाळता येते    , गहू ,ज्वारी, बाजरी, मक्का, नाचनी, व तेल वर्गीय पिके.

त्याकरिता नेहमी मल्टीलेअर शेती करावी म्हणजे मुख्यपिक एक दल किंवा तेल वर्गीय असेल तर त्यामध्ये द्विदल हे अंतरपिक घेतले पाहिजे

ह्युमस : (जीवन द्रव्य)
ह्युमस हे अखंड 24 तास चालनार व सतत काहितरी निर्माण करणार व त्याच वेळेला काहितरि घटवनार व जमिनीला सुपिकता प्रदान करणार एक अद्भुत एक असं जैव रासायनिक संयंत्र आहे(बायोकेमिकल). या मध्ये सतत असे काही पदार्थ निर्माण होत असतात जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामध्ये सर्वच प्रकारचे अन्नद्रव्य,सेंद्रिय आम्ल(ह्युमीक अ‍ॅसीड), संजिवक(हारमोन्स) आणी पिकांना प्रतीकार शक्ती देणारे प्रतीपिंड यांचा समावेश असतो. कोणत्याहि पिकांना लागणारे अन्नद्रव्य म्हणजे जीवन द्रव्य हे पिकांच अन्न भंडार आहे
ह्युमस मध्ये 60% सेंद्रीय कार्बन व 6% सेंद्रीय नत्र असतो. म्हणजे ह्युमस मध्ये कार्बन आणि नत्र यांचा प्रमाण 60:6 म्हणजे 10:1 असतो. ह्याला कर्बनत्र गुणोत्तर

 पिकांच्या पानरूपी इंद्रीयाणी प्रकाश संश्‍लेषणच्या मध्यमातुन हवेतुन घेतलेले कार्बन होय. 

सेंद्रीय नत्र म्हणजे काय ?
सहजीवी व असहजीवी नत्रांनुनी आपल्या इंद्रीयाच्या माध्यमातुन हवेतुन घेतलेला नत्र म्हणजे सेंद्रीय नत्र होय. ऊसाचे अंतरपिक चवळी, हरबरा
सेंद्रीय कर्बाचे प्रकार
1) उडनशील(पळपुट्टया) कर्ब वोलाटार्इल कार्बन
2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन
3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन

1) उडनशील कर्ब वोलाटार्इल कार्बन
कोणतेही अंतरपिक फुलोरयावर येणाच्या आधी कापून  आच्छादन करतो ते आच्छादन कुजून जो कर्ब मोकळा होतो त्या कार्बनला पळपुट्टया कार्बन म्हणतात.
हा कार्बन ह्युमस मध्ये कधीच जमा होत नाही  व हवेत निघून  जातो व वातावरणाचा तापमान वाढवतो. त्यामुळे फुलोऱ्याच्या काळात आच्छादन करू नये.
2) अस्थिर कर्ब अनस्टेबल कार्बन
कोणताही अंतरपिक फुलावर आल्यानंतर ते कापून  आच्छादन केले तर त्यामध्ये अस्थिर कर्ब असतो. तो कधीच ह्युमस मध्ये जमा होत नाही पण हा कर्ब ताबडतोब मुक्त होत नाही काही  वेळांनी मुक्त होतो व हवेत निघून जातो म्हणुन हा अस्थिर कर्ब आपल्या कामाचे नाही  म्हणुन कोणतेही अंतरपिक फुलोरयावर कापू  नये.
3) स्थीर कर्ब स्टेबल कार्बन
हा स्थिर कर्बच फक्त ह्युमस मध्ये जमा होतो. ह्याच्यामुळे ह्युमस ची निर्मिती होते जेव्हा अंतरपिकांचे दाने पक्व होण्याच्या स्थीतीत असतात त्यावेळेस
कर्बाची निर्मीती होते. आणी हा स्थीर कर्ब लीगनीन(काष्ठजन्य पदार्थ) व सेल्युलोज (काष्ठक जन्य पदार्थ) ह्याच्यामध्ये संग्रहीत होते. म्हणुन ह्युमस निर्माण करण्यासाठी दाणे पक्व झाल्यानंतर आच्छादन .           

1)मृदाच्छादन (मातीचे आच्छादन सॉइल मल्चींग) म्हणजे जमिनीची मशागत
2)काष्ठाच्छादन (स्ट्रॉ मल्चींग काडी, कचरा)
3)सजीव आच्छादन ( लार्इव मल्चींग) अंतरपिके
1) मृदाच्छादन :
जमिनीला सतत भेगा पडत असतात व त्याभेगातून  जमिनीतील ओलावा निघून  जात असतो. जसजसे उष्णतामान वाढतो तसतसे ओलावा उडण्याचा वेग वाढतो त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा राहत नाही . त्यामुळे जमिनीमध्ये काम करणाऱ्या जीवजंतुंना व मुळयांना ओलावा मिळत नाही  परिणामी जीवजंतु मरतात व ह्युमसची निर्मीती थांबते व त्या भेगांतून  कार्बन सुद्धा वेगाने उडून  जातो ह्याल कार्बन ऑक्सीडेशन म्हणतात. त्यामुळे जमिन वाळवंट बनते. आपल्या जमिनीमध्ये 2.5% कार्बन पाहिजे तरच आपली जमीन  पैलवान बनते.
त्यासाठी जमिनीतून  कार्बन उडून जाणे थांबवले पाहिजे व जमिनीमध्ये ओलावा टिकून  ठेवला पाहिजे. ह्यासाठी कोरडवाहू शेतीमध्ये मशागत केली जाते.
मशागतीचे ऊद्देश
1) जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे
2) पावसाचे पाणी संग्रहीत करणे
3) तणांचे  नियंत्रन करणे
जमिनीतील मुळयांना व जीवजंतुंना हवा पाहिजे म्हणुन हवा खेळती ठेवायची त्यासाठी पावसाचे पाणी साठवणे, त्यासाठी मशागत म्हणुन प्राचीन काळापासुन लाकडी नांगराने, वखराने व कोळप्याने जमिनीची मशागत केली जाते व ती संपुर्ण शास्त्रीय आहे. मात्र कृषीविदयापिठांच्या शिफारसीनुसार ट्रॅक्टर ने केलेली खोल मशागत चुकीची व अशास्त्रीय आहे.
सजीव आच्छादन लार्इव मल्चींग
सजीव आच्छादन म्हणजे आंतरपिके व मिश्र पिके.
आंतरपिकं कशी आसावी.
1) मुख्य पिक एक दल असेल तर अंतरपिक द्विदल असले पाहिजे आणी मुख्य पिकं द्विदल असेल तर अंतरपिकं एकदल असली पाहिजेत .
2) आंतर पिकांची उंची मुख्यपिकाच्या उंचीच्या 1/3 किंवा निम्मे असले पाहिजे. म्हणजे दोन्ही पिकांची पान सक्षमपणे  सुर्यप्रकाश घेऊ शकतात व त्यांच्यामध्ये स्पर्धा होत नाही॰
3) मुख्य पिकांच्या खोल मुळया असतील तर अंतरपिकाच्या मुळया उथळ असल्या पाहिजेत . तसेच मुख्यपिकांच्या  मुळया उथळ असतील तर आंतरपिकाच्या मुळया खोल असल्या पाहिजेत .
4) आंतरपिकांचे आयुष्य मुख्य पिकाच्या आयुष्याच्या 1/3 किंवा निम्मा असला पाहिजे.
5) शक्यअसेल तर आंतरपिके वेगाने वाढणारी व वेगाने जमिन झाकून  टाकणारी असावि.
6) आंतरपिकांमध्ये शेंगावर्गीय, तेल वर्गीय, पाले-भज्या वर्गीय व फुलवर्गीय आंतरपिकाचा  समावेश असावा.
7) मुख्य पिकांमध्ये किंवा फळ बागामध्ये अशा सहजीवी  अंतरपिकाचं  नियोजन केलं  पाहिजे जेणेकरून आंतरपिकाची लावणी झाल्यानंतर वर्षभर प्रत्येक महिन्यात सतत त्या आंतरपिकांपासुन उत्पन्न मिळून आपल्या  आर्थिक गरजा भागल्या पाहिजेत
8) अंतरपिकांची पाण्याची गरज मुख्यपिकाच्या गरजेपेक्षा कमि असली पाहिजे.
9) मुख्य पिकावर येणाऱ्या या हाणीकारक किडींना खाऊन नष्ठ करणारया या मित्र किडी ज्या आंतरपिकांवर आकर्षीत होतात त्या आंतरपिकाचे नियोजन केले पाहिजे.
उदाहरणार्थ:
चवळीचे पान व फुल, झेंडुचे पान व फुल, देशी हरबरयाचे पान व फुल,तुळशीचे पान व मंजीरी, मक्क्याचा कंसावरील रेशमी तुरा, देशी उडदाचे फुल व पान, गाजरची पान, मुळयाचे पान व शेंगा, सोपची पान व फुलं , बाजरीचे कंसाची फुलं , तुरिची फुलं , मोहरीची पानं  व फुलं , तसेच कारळाची फुलं  व पानं , मेथीची पानं  व फुलं , तसेच शेवग्याची.

 

 पाणी पाहिजे ही संकल्पना चुकीची आहे. तर पिकांच्या मुळींना वाफसा पाहिजे.उदाहरणात दुशकाळी पट्टयात पाऊस नसताना बिनासिंचनाच्या चिंचेच्या झाडाला अमाप चिंचा लागतात. 

1. वाफसा म्हणजे काय ?
जमिनीत दोन मातीकण समुहादरम्यान ज्या रिकाम्या पोकळया असतात त्या रिकाम्या पोकळयामध्ये पाण्याच अस्तीत्व अजीबात नको, तर 50% पाण्याची वाफ व 50% हवा ह्यांच संमिश्र पाहिजे. ह्याच स्थीतीला वाफसा म्हणतात.
2. वाफसा घेणारी मुळी कुठे असते ?
कोणत्याहि झाडाची दुपारि बारा वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटच्या सिमेवर अन्न आणि वाफसा घेणारी मुळी असते. ती त्या सावलीच्या आत नसते.झाडाच्या मुळीला किती प्रमाणात वाफसा पाहिजे हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुळींचा असतो आपला नसतो.
दुपारि 12 वा. पडणाऱ्या  सावलीच्या कडेला जर अन्न व वाफसा घेणारी मुळी आहे, जर आपण  सावलीच्या सीमेवर पाणी दिले तर तो निर्णय आपला असतो. अशा स्थीतीत वाफसा होत नाही . परंतु जर आपन सावलीच्या सीमेच्या 6 इंच बाहेर पाणी दिले तर मुळी त्या पाण्यापर्यंत जाते व पाहिजे तेव्हा वाफसा घेते.म्हणुन झाडाच्या सीमेवर पाणी देऊनये. तर 6 इंच बाहेर नाली काढून  पाणी दयावे.
सावलीच्या आतमध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या  पावसाचं पाणी थांबललं  किंवा सिंचनाचं पाणी थांबलं  तर मुळया सडतात व सडीचे प्रमाण वाढेल. अशा स्थीतीमध्ये झाडाच्या मुळीला  फायटोथोरा बुरशी लागते आणि मुळीचं  आवरण  सडवून टाकते. त्यामुळे  वर जाणार अन्न पुरवठा बंद होऊन फांदयांवर झाड सुकायला लागते.  परंतु  जर आपण सावलीच्या सीमेपासून खोडापर्यंत मातीचा भर दिला व बाहेर उतार काढला तर पावसाचं  व सींचनाचं  पाणी ताबडतोब बाहेर निघून जाते  व मुळया सुरक्षित राहतात.
फायटोथोरा बुरशी प्रचंड नुकसान करते परंतु तिथे नियंत्रण करणारी मित्र बुरशी ट्रायकोडरमा जर आपन जमिनी़मध्ये उपलब्ध केली तर फायटोथोरा चे नियंत्रन होते. जीवामृतामध्ये ट्रायकोडरमा बुरशीचे जीवाणू असतात . म्हणून जीवामृताचा सतत वापर केला व झाडाच्या खोडाला माती चढवून पाण्याचा उतार बाहेर काढून दिला व सावलीच्या 6 इंच बाहेर सरी काढुन सिंचनाचे पाणी दिले तर फळ झाडावर मर किंवा डिंक्या रोग येत नाही माती चढवल्यावर पावसाचे   पाणी निघून जार्इल परंतू जमिनीच्या आत मुळीजवळ अतिरीक्त ओलावा कायम असतो. त्यामुळे सुद्धा रोग निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु जर आपण सीमेच्या 6 इंच बाहेर सरी काढली तर मुळी जवळचा ओलावा नालीत उतरतो व मुळीजवळ वाफसा होतो.

पाणी व्यवस्थापन :

1. झाडाची हिरवी पाने प्रकाश संश्‍लेषन क्रियेच्या माध्यमातुन जे अन्न तयार करतात ते खोडामध्ये साठवतात. जर खोडामध्ये 100 किलो अन्न साठवलेले असेल तर त्यापासून आपल्याला 33 किलो धान्याच उत्पादन मिळते किंवा 50 किलो फळाचा, ऊसाच उत्पादन मिळते.याचा अर्थ खोडमध्ये जितका जास्त अन्न साठवला जार्इल तेवढा जास्त उत्पादन मिळेल. म्हणजे पानांनी सगळ तयार केलेल अन्न बुडात साठले पाहिजे त्यासाठी खोडाचा घेर मोठा असला पाहिजे.
2. परंतु जर खोडाचा घेर कमि असेल तर पान अन्न निर्मीती घटवतात. त्यामुळे उत्पादन घटत. जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर पानांनी त्यांच्या पूर्ण क्षमतेने तयार केलेले अन्नसाठा खोडात साठवण्यासाठी  खोडाचा घेर वाढवला पाहिजे.
3. खोडाचा आकार तेव्हाच वाढते जेव्हा मुळीचा आकार वाढतो. म्हणजे खोडाचा आकार वाढवण्यासाठी आपल्याला मुळीचा आकार वाढवला पाहिजे.
4. मुळीचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळीची लांबी वाढते. म्हणजेच मुळीची लांबी वाढवली पाहिजे.
5. मुळींची लांबी तेव्हाच वाढते जेव्हा मुळी पासून पाणी दुर दुर नेल्या जाते. म्हणजे आपल्याला पाणी मुळीपासून

खरिप आणी हंगामी पिके

 जमिनीची टॅ्रक्ट खोल मशागत करू नये. टॅ्रक्टरने मशागत करणे आवश्यक असेल तर कल्टीवेटर किंवा रोटावेटरने मशागत करावी जेणे करून जमिनीची उलथापालथ  होणार नाही शेवटची वखरपाळी करण्याच्या आधी प्रती एकरी 

200 ते 400 किलो घनजिवामृत विस्कटून टाका व अंतिम मशागतीने मातीमध्ये मिसळून टाका.
जर पिकांची लागवण चौफुली पद्धतीने करायची असेल तर चौफुलीवर उपलब्धतेनुसार प्रत्येक फुलीवर एक मूठ किंवा एक ओंजळ  घनजिवामृत फुलीवर टाका जेणे करून बी टोकता येइल.
चौफुल्या पाडताना सुरूवातीला उताराच्या दिशेने पाडा व नंतर आडव्या दिशेने पाडा. म्हणजे वाहून जानारा पाणी आडेल.व पावसाचे पाणी मुरेल.

बियाणे

शक्य असेल तर कोणत्याहि स्थीतीत गावरानी बीयाणे वापरावे. ते शक्य नसेल तर सुधारित बियाणे वापरावे. पण चुकूनही संकरित बियाणे किंवा बीटी बियाणे वापरू नका. जर आणिबानित गावरानी किंवा सुधारित बियाने उपलब्ध झाले नाही॰ व संकरीत बियान्याशीवाय कोणताही उपाय नाही अशा वेळेस बाजारामध्ये जे संकरीत बियाणे जास्त चालते ते संकरीत किंवा बीटी बियाणे पेरून त्या पेरलेल्या पिकातून सर्वोत्कृष्ट , रोगमुक्त, कीडमुक्त,जास्त उत्पादन देणारे झाडे निवडून त्याचे बियाणे निवडून , त्या निवडलेल्या झाडाचे बियाणे दरवर्षी पेरून अशी निवड ६ वर्षे करून आपल्याला संकरीत बियाण्याचे किंवा बीटी बियाण्याचे सुधारित किंवा देशी बियाण्यामध्ये रुपांतर करता येते .आपले बियाणे आपल्याला तयार करता येते .
झिरो बजेट कृषी आंदोलनामध्ये काही गावे बीज ग्राम म्हणून विकसित करता येतील . व ते बियाणे अन्य नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करता येईल.
संकल्पना व मार्गदर्शन :-
कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर

संपर्क: पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर
१९,” चंदा स्मृती”, जया कॉलनी,

टेलिकॉम कॉलनी जवळ,साई नगरपोस्ट,

अमरावती- ४४४६०७ (महाराष्ट्र)
मो.न.09423601004,9673162240,
9850352745

निर्मिति ,संकल्पना, रचना

1)श्री केशव राहेगावकर नांदेड़
संपर्क :- ०९४२२१७०६६५/०९०९६९३०३४१

2) श्री सुनील राठोड नांदेड़
संपर्क :- ०९८२२६३९०५३

3) श्री सुरेश कुलकर्णी नांदेड़
संपर्क :- ०९२२६११८८३६/०८६९८३७२०९६
4) श्री दीपक मोरताळे,नांदेड
संपर्क:- ०९४२२१७४६४७

शुन्य खर्च शेतीचा “बळीराजा ” पद्मश्री श्री सुभाष पाळेकर.
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top