निवेदन द्यावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधकांनी केली. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. तसेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात. मात्र, याच मुद्द्यावर ते अद्याप गप्प का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी हाती घेताच अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. तर सरकारने उच्च पातळीवर हस्तक्षेप करून भारतीयांच्या संरक्षणाबाबत ठोस पावले उचलावीत; तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत, हे पाहावे, असे अण्णा द्रमुकचे नेते एम. थंबीदुराई म्हणाले. तर अमेरिकेत राहणारे भारतीय सुरक्षित राहतील, यासाठी योग्य पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही देतो. याबाबत सरकारतर्फे लवकरच सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले. अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. एका अभियंता तरुणाचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तर एका भारतीय वंशाच्या व्यापाऱ्याचीही त्याच्याच घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहेत. गेल्या काही दिवसांत भारतीय नागरिकांवर अमेरिकेत होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी देशातील विविध स्तरांतून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.