मुख्य बातम्या

सुरवात OBC नव पर्वाची,नव्या नेतृत्वाची….

सुरवात OBC नव पर्वाची,नव्या नेतृत्वाची .धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी मुख्यमंत्री पदासाठी जाहिर करू शकतात नाव....

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा दुवा ठरला तो OBC समाज , हा समाज ज्याच्या पारड्यात त्याचे सरकार हे महाराष्ट्राच्या राजकारणाने पहिले आहे .
एके काळी OBC समाजाचे नेतृत्व मा. छगन भुजबळ आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या राजकारणातील काळ आणि वेळ चांगलीच गाजवली.पण नियतीने आणि काळाने हे दोन्ही चेहरे समोर आता नाहीत.
त्यातच OBC गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार मानल्या जाणाऱ्या मंत्री.पंकजा मुंडे भ्रष्टाचार आणि अनुभवाच्या कमी मुळे चांगल्याच पिछाडीवर ढकलल्या गेल्या आहेत.

अशात वेळ आली आहे नेतृत्व निवडीची ?
आता त्यातच नवीन चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र राज्याचे वि.प.ने.मा.धनंजय मुंडे यांच्या नावाची त्याचे कारण ही तसेच आहे .मा. धनंजय मुंडे याना उत्कृष्ट वक्तृत्व , संघटन कौशल्य,राजकारणात सत्ताधाऱ्यांवर पकड ठेवणारे मराठवाड्यातील तरुण आणि कणखर अशी काहीशी त्याची ओळख असलेले नेतृत्व मा. धनंजय मुंडे.
मा.गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या राजकारण जवळून पाहिलेले ते एकमेव युवा पिढीचे नेतृत्व दिसत आहे .
आत्ताच झालेल्या Z.P आणि पालिका निवडणुकीत महाराष्ट्राभर सर्वाधिक 10 दिवसात 72 पेक्षा सभा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
महाराष्ट्रभर वाढत असलेला त्यांचा दांडगा लोकसंपर्क , समजाची कार्यकर्त्याची साखळी ,कार्यकर्त्यांची फळी,विधानपरिषदेत शेतकऱ्यांसाठी व OBC साठी आवाज उठवणार चेहरा दिसून येत आहे.

मा.धनंजय मुंडे OBC चा नवीन चेहरा म्हणून ओळखला जातोय. धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी मुख्यमंत्री पदासाठी जाहिर करू शकतात नाव…..

सुरवात OBC नव पर्वाची,नव्या नेतृत्वाची….
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top