महाराष्ट्र

कर्नाटक सरकार धास्तावले , धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल.

धनंजय मुंडेंमुळे कर्नाटक सरकारला भरली धडकी;  बेळगावातील भाषण प्रक्षोभक ठरवून केला गुन्हा दाखल

बेळगांव दि.11…………..महाराष्ट्र एकिकरण समितीने बेळगावमध्ये आयोजित केलेल्या महामेळाव्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती भाषणामुळे कर्नाटक सरकार चांगलेच धास्तावले असुन या मेळाव्यातील मुंडे यांच्या भाषणाला प्रक्षोभक ठरवत त्यांच्या विरूध्द सोमवारी सायंकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमाभागातील मराठी बांधवांवर होणार्‍या अन्याया विरुध्द वाचा फोडण्यासाठी तसेच बेळगाव, कारावार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी सोमवारी बेळगावात एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळाव्यासाठी धनंजय मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

या मेळाव्यासाठी मुंडे यांना उपस्थित राहता येऊ नये यासाठी कर्नाटक सरकारने त्यांना प्रोटोकॉल नाकारला. इतकेच नव्हे तर दोन दिवस कर्नाटक पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत मुंडे यांनी रविवारी रात्रीच बेळगाव गाठले आणि संमेलनाला उपस्थित राहुन जोरदार भाषणही दिले.

मुंडे यांच्या या भाषणामुळे कर्नाटक सरकारचा चांगलाच तिळपापड उडाला आहे.

कर्नाटक सरकार विरूध्द रस्त्यावर, न्यायालयात, सभागृहात शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार करतांना या आंदोलनात युवकांनी आता पुढाकार घ्यावा असे आवाहन करत युवकांच्या भावनाही मुंडे यांनी चांगल्याच पेटवल्या होत्या त्यामुळे पित्त खवळलेल्या कर्नाटक सरकारने त्यांच्या विरूध्द प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे.

मुंडे यांच्यासह कोल्हापुर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, एकिकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी व इतर पदाधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान सिमाभागातील आपल्या मराठी बांधवांसाठी असे 1  नाही तर 56 गुन्हे दाखल झाले तरी आपण त्याला भित नाही असे प्रतिउत्तर धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

———————————————-

Most Popular

To Top