बुलढाणा :संगणक व्हायरस प्रभावित होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. संगणकावर काम करणाऱ्यांना व्हायरस हा प्रकार अगदीच सवयीचा झालेला आहे. पण हेच संगणकीय व्हायरस मानवी शरीराला प्रभावित करू शकतीला का? होय, या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे.
विविध व्याधी आणि आजार बरे करण्यासाठी मानवी शरीरात मायक्रो कम्प्युटिंग उपकरणे बसवावी लागतात. अशी उपकरणे संगणकाच्या प्रोग्रॅमवरच चालत असल्याने ती हॅक केली जाऊ शकतात असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्रदयात बसवले जाणारे पेसमेकर होय. हे पेसमेकर संगणकीय प्रोग्रॅमच असतात, या शिवाय पर्किन्सन आजाराच्या उपचारासाठी वापरले जाणारे ब्रेन पर्किन्सन्स, इन्सुलिन पंप या सर्वांतच संगणकीय प्रोग्रॅम आहेत. याशिवाय ‘नॅनो बोट’च्या सहायाने शस्त्रक्रिया यशस्वी करता येतील असे ही शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. हे सर्वच संगणकीय प्रोग्रॅम असल्याने ते भविष्यात हॅक केले जाऊ शकतील असे शास्त्रज्ञांना वाटते.
२०१२ मध्ये आरएसए सिक्युरियी कॉन्फरन्स या परिषदेत काही संशोधकांनी हा दावा केला होता.
सध्याच्या परिस्थितीत हे हॅकिंग सोपे नसले तरी ज्या वेगाने डिजिटल क्षेत्रात शोध लागत आहेत, ते पाहता भविष्यात हे अशा प्रकारचे हॅकिंग शक्य होईल, असे या परिषदेत मांडण्यात आले होत.