मुख्य बातम्या

शेतकऱ्याला सभागृहात आणतो :- धनंजय मुंडे आक्रमक

महासत्ता, ज्ञानेश्वर बडे :- विधानपरिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर झालेल्या कर्जमाफी चर्चेवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज खूप आक्रमक दिसून आले,
विरोधी पक्षाच्या बाबत मंत्र्यांमध्ये का आकस आहे हे कळून येत नाही, आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आणि सरकारवर पुराव्यानिशी आक्षेप घेतल्यानंतरही विरोधी पक्ष हा कांगावा करतोय असं म्हणण्याचा मंत्र्यांना काय अधिकार आहे.
सभापती आपण परवानगी द्या शेतकऱ्याला विधान परिषदेच्या सभागृहात घेऊन येतो, पुराव्यानिशी दाखवू ही कर्जमाफी फसवी आहे असं वक्तव्य करत धनंजय मुंडे सभागृहात आक्रामक दिसून आले.

दरम्यान , सुभाष देशमुख मंत्री यांनी विरोधी पक्ष कांगावा करत आहे , अस वक्तव्य केले होते.

Most Popular

To Top