समाजउन्नतीची कास धरत काम करणाऱ्या तरुण उद्योजक काकासाहेब खाडेचे मनपूर्वक धन्यवाद : मा.ना.धनंजय मुंड
मुंबई : युवा उद्योजक काकासाहेब भाऊसाहेब खाडे यांनी त्यांचा २९वा वाढदिवस साध्यापद्धतीने साजरा करून दुष्काळग्रस्त जनतेला मदतनिधी म्हणून दीड लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ निवारण्यासाठी काम करणाऱ्या नाथ प्रतिष्ठानास दिला. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे काकासाहेब खाडे यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला
हि मदत त्यांनी राज्याचे लोकप्रिय विरोधीपक्षनेते मा.धंनजय मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला .समाजउन्नतीची कास धरत काम करणाऱ्या या तरुण उद्योजकास मनपूर्वक धन्यवाद अशा प्रकारचे गौरवउदगार विरोधी पक्षनेते मा. धनंजय मुंडे यांनी या वेळी काढले. यावेळी शुभम तोंडे, मंगेश मिसाळ, नवनाथ सांगळे आदी उपस्थित होते.