महाराष्ट्र

तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली, दि. 11 :   गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत, महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे.

देशातील तरूण मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये 30राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी 95 टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा समावेश आहे.

वर्ष 2016-17मध्ये महाराष्ट्रातील 3हजार 980 तरूण , वर्ष 2017-18मध्ये  3 हजार 836 आणि वर्ष 2018-19 मध्ये 4हजार 50 तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत.

भारतीय सैन्यात वर्ष 2016-17 मध्ये 52 हजार 86 तरूण दाखल झाले, वर्ष 2017-18 मध्ये 49 हजार 438 तर वर्ष 2018-19 मध्ये 53 हजार 378 दाखल झाले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 

             

000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.53/दिनांक ११.०३.२०२०

Most Popular

To Top