महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि. 12 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विधानभवनातील पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर श्री. ठाकरे यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदींनीही यावेळी यशवंतराव चव्हाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली.

Most Popular

To Top