महाराष्ट्र

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. १२ : विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत जाहीर केला.

निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या १३ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभेचे सचिव (कार्यभार) यांच्याकडे नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. उमेदवारी अर्जांची छाननी याच दिवशी दुपारी १२ वाजता होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ मार्च रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास १४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजता विधानसभागृहात निवडणूक होईल.

Most Popular

To Top