महाराष्ट्र

कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाची सुनावणी दि. ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान मुंबईत

कोरोनापार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल
मुंबई, दि. 18 : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. 30मार्च ते 4 एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.18.3.2020

Most Popular

To Top